| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ सप्टेंबर २०२४
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियान अंतर्गत आज आमराई सांगली येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
आयुक्त शुभम गुप्ता यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेत गणेश मूर्ती तयार केली. मूर्ती तयार करण्याच्या आनंद घेतला. या कार्यशाळेत महापालिका क्षेत्रातील 400 हून अधिक पर्यावरणप्रेमी गणेशभक्त सहभागी झाले होते. उपआयुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार ही कार्यशाळा संपन्न झाली.
प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, या उद्देशाने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. यासाठी शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार वंदना सेवलकर यांच्या माध्यमातून सर्वांना गणेश मूर्ती कशा बनवायच्या याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाते. महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी ही कार्यशाळे आयोजित करण्यात आली आहे.
आमराई मध्ये सकाळी नऊ वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली. यामध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील अनेक गणेश भक्त, नागरिक, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी सहभाग घेतला होता. या तीन तासाच्या कार्यशाळेत एकूण 400 गुण अधिक गणेशभक्त सहभागी झाले होते या सर्वांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत.
यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनीही कार्यशाळेला भेट देत सर्वांचे कौतुक केले. तसेच आयुक्त शुभम गुप्ता यांनीही या कार्यशाळेत सहभागी होत स्वतः गणेश मूर्ती बनवली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण आणि माजी वसुंधरा अभियानाचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे संयोजन मनपाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, राकेश धायिंजे, ऋषिकेश डुबल, शिवम शिंदे आदींनी केले. यावेळी दीपक चव्हाण यांच्या गणेश भक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.