yuva MAharashtra प्रिलिटीगेशन नोटीस बजावलेल्या वाहनधारकाकडून 2,08,350/- रुपये दंड वसूल !

प्रिलिटीगेशन नोटीस बजावलेल्या वाहनधारकाकडून 2,08,350/- रुपये दंड वसूल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ सप्टेंबर २०२४
सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून मोटार वाहन अधिनियम अंतर्गत प्रलंबित चलन असलेल्या वाहनधारक यांना लोक अदालत अंतर्गत प्रिलिटीगेशन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित लोक अदालतमध्ये विशेष मोहिमे अंतर्गत वा. शा. सांगली कडून 309 चलन धारकांकडून रक्कम 2,08,350/- रुपये दंड रोख व ऑनलाईन स्वरूपात भरून घेतला. 

तसेच दि. 1 ते 28 सप्टेंबर 2024 अखेर लोक अदालत अंतर्गत संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकूण 4,465 चलन धारकांकडून एकूण 30,81,550/- रुपये रक्कम दंड स्वरूपात भरून घेण्यात आली.


सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक श्री. संदीप घुगे साहेब, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती विमला एम मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक शेखर निकम पोलीस हवालदार यमगर, महिला पोलीस हवालदार मुल्ला आणि वन स्टेट वन चलन चे प्रतिनिधी श्री प्रवीण माळी यांनी पार पडलेली आहे.