| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १ सप्टेंबर २०२४
कधी कधी एखादी साधी गोष्ट हे आपल्याला खूप महागात पडू शकते. एखाद्या छोट्याशा हव्यासापोटी लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. . विशेषतः महिलांच्या बाबतीत ही बाब अधिकतर घडते. परंतु नंतर हळहळ व्यक्त करून उपयोग होत नाही. असाच प्रकार पुण्यातील एका जोडप्याच्या बाबतीत घडला.
पुण्यातील एका वडापाव सेंटर समोर ही महिला आपली दुचाकी स्टैंड वर लावत होती. त्यावेळेस चोरट्याने संधी साधून गाडीला लावलेले पिशवी घेऊन पोवारा केला, ज्यामध्ये 195 ग्रॅम सोनव होतं. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत तब्बल 14 लाख रुपये होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने आपल्या पतीसोबत हडपसर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंद केली. सदरची घटना येथील सीसीटीव्हीमध्ये कैरी झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यात सध्या गुन्ह्याच्या अनेक घटना घडत असून नागरिक या साऱ्या प्रकाराला वैतागले आहेत. खून, मारामाऱ्या, अपघात तर नित्याच्याच झाल्या असून, जबरी चोरी आणि दरोडे या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पोलीस आयुक्त या वाढत्या गुन्ह्यांबाबत अलर्ट झाले असून, संपूर्ण पोलीस यंत्रणा अशा गुन्ह्यांवर लक्ष ठेवून आहे. तरीही दररोज अशा घटना घडत असल्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.