| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ सप्टेंबर २०२४
ठाकरे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची आपल्या बेताल आणि बिनधास्त वक्तव्याबद्दल ख्याती आहे. विरोधकांवर आरोप करीत असताना, अनेकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावरून समाज माध्यमावरून तसेच विरोधी पक्षातून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे. कित्येकदा त्यांना स्वतःसह पक्षालाही नामशकी पत्करावी लागली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे पाठबळ असल्यामुळे ते यातून काहीही शिकायला तयार नाहीत. आणि याचाच परिपाक म्हणजे त्यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यात शिवडी न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्या सौभाग्यवती मेधा सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी मीरा-भाईंदर परिसरातील शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. यावेळी सौ. सोमय्या यांनी आरोप बाबत ठोस पुरावे द्यावेत असा आव्हान दिलं होतं. मात्र कोणतेही पुरावे न दिल्यामुळे सौ मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा मानहानी दाबा दाखल केला होता. अर्थात या प्रकरणात संजय राऊत यांना 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मात्र सुनावणीच्या वेळी ते कोर्टात उपस्थित नव्हते.
या निकालाबाबत प्रतिक्रिया देताना सौमेरासमय्या यांनी म्हटले आहे की आजही आपली न्यायव्यवस्था रामशास्त्री प्रभुणे यांच्या पावलावर पाऊल टाकून चालते आहे. माझ्यावर अथवा माझ्या मुलावर वा कुटुंबीयांवर कोणी वैयक्तिक आरोप करीत, प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असेल तर एक सामान्य गृहिणी जशी लडेल तशीच मी लढले. न्यायालयाने मला न्याय दिला आहे. मी समाजसेवा करते आणि शिक्षण ही देते. या दोन्ही गोष्टींचा सन्मान न्यायालयाने केला असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना या निर्णयामुळे साप बसेल अशी प्रतिक्रिया संमेधा सोमय्या यांनी व्यक्त केले आहे. परंतु त्याचवेळी या निकालावरून काहीही धडा न घेता संजय राऊत यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी थेट सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावरच निशाणा साधला आहे. जिथे सरन्यायाधीशांच्या घरी मोदक खायला पंतप्रधान जातात तिथे आम्हाला काय न्याय मिळणार असे राऊत यांनी केले आहे. न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. आता राऊत यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा वातावरण तापणार हे नक्की.