yuva MAharashtra बागणीचे सुपुत्र अविनाश सुर्वेंनी केले आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर !

बागणीचे सुपुत्र अविनाश सुर्वेंनी केले आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांच्या, डोंगररांगाचा... आणि हिम्मत बहाद्दूर तरुणांचे राज्य... येथील अनेक तरुणांना ट्रेकिंगचे वेड... छोट्या-मोठ्या डोंगरदर्‍यातून फिरत आपले हे वेड तरुण पूर्ण करीत असतात. काही वेडे तर हिमालयातील उंचच उंच शिखर सर करून त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीत असतात. त्यातून त्यांना आनंदही मिळतो आणि शाब्बासकीही...

असाच एक बागणी गावचा हिम्मत बहादूर... ज्याचं नाव अविनाश सुर्वे. सुर्वे यांनी थेट दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच असलेल्या किलीमंजारोवर थेट यशस्वी चढाई केली. किलीमंजारो हे समुद्रसपाटीपासून ठाण 5895 मीटर उंचीचे शिखर. 10 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 या दरम्यान सुर्वे यांनी किलीमंजारोवर भारतीय तिरंगा फडकावला. आपल्या कामगिरीचा फोटो सोशल मीडियावर वायरल केल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


सुर्वे यांनी यापूर्वी मार्च 2024 मध्ये एवरेस्ट बेस कॅम्पचे 5365 मीटरची यशस्वी चढाई केली आहे. सुर्वे यांना लहानपणापासूनच ट्रेकिंगची आवड. बागणीच्या आसपास असलेल्या डोंगर रांगावरील ट्रेकिंगमुळे त्यांच्यातील साहस वाढले. महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक उंच शिखरावर चढाई केले होती. 

सध्या सुर्वे हे दुबई येथील जीईएमएस मॉडर्न अकॅडमीमध्ये पर्यवेक्षक आणि आयसीएसई मध्ये इंग्रजी भाषा, इंग्रजी साहित्य आणि थिएटर त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिप्लोमा अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲन्किलोजिंग स्पॉंडिलायसिस नावाच्या आजाराने ते त्रस्त आहेत. तरीही आपल्या आजाराला ते ट्रेकिंगच्या आणि धाडसी उंचच उंच शिखर चढाईच्या आवडीच्या आर येऊ देत नाहीत हे महत्त्वाचे.