Sangli Samachar

The Janshakti News

लाडक्या बहिणी, कपटी भावाला धडा शिकवतील मुख्यमंत्री शिंदे यांचा विरोधकावर हल्लाबोल !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ ऑगस्ट २०२४
केवळ विरोधासाठी विरोध म्हणून चांगल्या कल्याणकारी योजनांना विरोधक खोडा घालण्याचे काम करीत असून, महिलांना संसारात हातभार लावणाऱ्या ' मुख्यमंत्री लाडके बहीण' योजना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी आपल्या माणसांना या योजने विरोधात न्यायालयात पाठवले आहे, आता लाडक्या बहिणीच या कपटी आणि सावत्र भावांना धडा शिकवतील, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.


याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधकांनी टीका केली की लाडक्या भावांचे काय ? तेव्हा आम्ही लाडका भाऊ योजना ही आणली मात्र या योजना बंद पडाव्यात आणि लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत म्हणून या कपटी सावत्र भावांनी आपल्या माणसांना न्यायालयात पाठवले आहे. 

कर्नाटकात काँग्रेसच्या सरकारने अनेक योजना आणल्या. पण आता ते म्हणत आहेत यासाठी पैसा नाही. हा यांचा जुमला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही देणारे आहोत घेणारे नाही असा हल्लाबोल हे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला.

दरम्यान मुंबई हायकोर्टाने लाडकी बहीण योजनेची सुनावणी ताबडतोब न घेता, 6 ऑगस्ट 2019 ही तारीख दिली आहे. आता या योजनेचे भवितव्य या तारखेस ठरणार आहे.