| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ ऑगस्ट २०२४
सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेतर्फे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रोजगार मेळावा आयोजित केला असल्याची माहिती मनपा उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे 173 लाभार्थ्यांना किंवा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची नियोजन केलेले आहे. याच्यामध्ये महानगरपालिका आस्थापनेवरील विविध पदं जास्त करून तांत्रिक पदांवर महानगरपालिकेने भर दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार 6 ते 8000 आणि 10000 या प्रमाणामध्ये पुढील सहा महिन्यासाठी स्टायपेंड आपल्या प्रत्येक उमेदवाराला मिळणार आहे. या युवा कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे रोजगारांमध्ये वाढ होण्याबरोबरच युवकांच्या कौशल्यामध्येही वाढ होणार आहे. तसेच अनुभवामध्ये वाढ होणार आहे आणि त्यांना भविष्यातील नोकरीसाठी ते सक्षम होणार आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. हा रोजगार मेळावा उद्या दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सुरू होणार असून सर्वांनी या मेळाव्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहनही उपआयुक्त वैभव साबळे यानी केले.