yuva MAharashtra महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी सांगली येथील दिपक गायकवाड यांची निवड !

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी सांगली येथील दिपक गायकवाड यांची निवड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑगस्ट २०२४
अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओ.बी.सी. विभाग श्री अजितसिंग यांच्या आदेशानुसार, सांगलीच्या दिपक शामराव गायकवाड यांची उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ओ.बी.सी. विभाग या पदावर निवड करण्यात आली आहे


संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एक्स कोर्डिनेटर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राजेंद्र परसावत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी दिपक गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ओ.बी.सी.विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, आमदार विश्वजीत कदम, काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील तसेच महाराष्ट्रातील काँग्रेस नेते कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामगिरी करण्याची ईच्छा दिपक गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. दीपक गायकवाड यांचे या निवडीबद्दल सांगली जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.