yuva MAharashtra इंग्रजांना पळवून लावलेली क्रांतीज्योत काँग्रेसने प्रज्वलित केली - पृथ्वीराज पाटील

इंग्रजांना पळवून लावलेली क्रांतीज्योत काँग्रेसने प्रज्वलित केली - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
९ ऑगस्ट हा क्रांतीदिन.. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारुन भारतीय जनतेने त्यांना पळवून लावले. या रोमांचकारक इतिहासाला उजाळा देणाऱ्या क्रांतीज्योत रॅलीचे पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चौकातील(स्टेशन चौक) म. गांधी यांच्या पुतळ्यापासून हुतात्मा स्मारकापर्यंत आयोजन करण्यात आले होते. 

सकाळी साडे आठ वाजता म. गांधी यांच्या पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले व राष्टगीताचे गायन झाले. त्यानंतर त्यानंतर पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योत रॅली मार्गस्थ झाली. स्व. वसंतदादा पाटील, हुतात्मा अण्णा पत्रावळे, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सहकार तपस्वी माजी खासदार स्व. गुलाबराव पाटील व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यांना पृथ्वीराज पाटील, शहाजी पाटील, अजित ढोले व रामचंद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सांगली काँग्रेसने महापुरुषांना विनम्र अभिवादन केले. 


रॅलीमध्ये अग्रभागी पृथ्वीराज पाटील यांच्या हातातील क्रांतीज्योतीचे प्रज्वलन लक्षवेधी ठरले. इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, क्रांतीदिन चिरायु होवो, म. गांधी की जय हो, स्वातंत्र्य सैनिक व हुतात्म्यांचा विजय असो अशा घोषणा ध्वज उंचावून काँग्रेस कार्यकर्ते देत होते. रॅली हुतात्मा स्मारकात पोहचल्यावर तेथे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन राष्ट्रगीत गायन झाले. 

या क्रांतीज्योत रॅली व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना अजित सुर्यवंशी, भाऊसाहेब पवार वकील, अजित ढोले, प्रा. एन.डी.बिरनाळे, शहाजी पाटील, अल्ताफ पेंढारी, विठ्ठलराव काळे, पैगंबर शेख, मौला वंटमुरे, अरुण पळसुले, अल्लाबक्ष मुल्ला, मनोज लांडगे, मनोज पवार, शिवाजी सावंत, विशाल सरगर, शमशाद नायकवडी, सीमा कुलकर्णी, मीना शिंदे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.