| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑगस्ट २०२४
वर्ल्ड गाईड असोसिएशनच्या वतीने लंडन येथे आंतरराष्ट्रीय कब - बुलबुल जमब्राऊनी संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी सांगलीमधून डॉ.बापट बाल शिक्षण मंदिर मधील 8 विद्यार्थ्यांची निवड केली होती. इवल्याशा चिल्ल्यापिल्ल्यांनी साता समुद्रा पार जाऊन सांगलीचे नाव अभिमानाने कोरले आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद सांगली विभाग यांच्या वतीने भारतीय रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या 159 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्यास भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. शेखर इनामदार साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री वहिनी पाटील, कार्याध्यक्ष दैवज्ञ समाज सांगली जितेंद्र पेंडुरकर, संजय भुर्के, मुकुंद पेडणेकर, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, आशाताई शिंदे,अशोक मालवणकर, नितीन काका शिंदे, विजय दादा कडणे आदी मान्यवर उपस्थित होते.