yuva MAharashtra सांगलीत पोलीस भरतीवेळी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचे उघड !

सांगलीत पोलीस भरतीवेळी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचे उघड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
नुकत्याच झालेल्या सांगलीतील पोलीस भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बसाप्पा पिरगुंडा हिप्परगी (रा. सिंदूर, ता. जत) असे फसवणूक केलेल्या या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हिप्परगी याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात पोलीस भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती यामध्ये संशयित बसाप्पा हिप्परगी सहभागी झाला होता. चालक पोलीस शिपाई पदाकरिता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत त्याची निवड झाली होती. परंतु पोलिसांनी कागदपत्राची छाननी केली असता बसाप्पा याने खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आले. यामध्ये आधार कार्ड, वाहन चालक परवाना, शाळा सोडल्याचे दाखले, डोमिसाईल प्रमाणपत्र, ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे. त्यामुळे बसाप्पा हिप्परगी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.