yuva MAharashtra कारचा एक्सीडेंट किंवा आजारी पडलात, विमा कंपनी येणार नाही मदतीला; जाणून घ्या कारण !

कारचा एक्सीडेंट किंवा आजारी पडलात, विमा कंपनी येणार नाही मदतीला; जाणून घ्या कारण !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ ऑगस्ट २०२४
आपल्या दुचाकी असो किंवा चार चाकी अपघात झाला तर विमा कंपनीकडून त्याची नुकसान भरपाई मिळत होती. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांना आरोग्य विम्याचा लाभही होत होता. परंतु आता या दोन्ही योजना बासनात बांधून ठेवण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. कारण सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांना नफ्यात आणण्यासाठी सरकारने एक योजना तयार केली असून या कंपन्यांना आता केवळ फायदेशीर व्यवसायावरच लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे.

वित्त मंत्रालयाने या सरकारी विना कंपन्यांना फायदेशीर व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत माहिती देताना वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी म्हणाले की आम्ही सर्वसाधारण विमा कंपनीच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहोत. नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या तीन कंपन्यांमध्ये 7,250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय न्यू इंडिया इन्शुरन्स आधीच नफ्यात चालू आहे. त्यामुळे वरील तिन्ही कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीत सुधारणा झाल्याचे जोशी यांनी सांगितले. 


पूर्वी या कंपन्या उत्पन्नात वाढ दाखवण्यासाठी त्यांचा व्यवसाय वाढवत होत्या परंतु आता केवळ व्यवसाय न वाढवता नफ्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज विवेक जोशी यांनी व्यक्त केले आहे. या विमा कंपन्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने नुकतीच 17, 450 कोटी रुपयांचे गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सरकार या कंपन्यांकडून अधिक नफा मिळावा यासाठी आग्रही आहे असेही जोशी यांनी म्हटले आहे. परंतु या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला साठ बसणार असल्याने, सर्वसामान्य ग्राहक आता विमा गुंतवणूक करताना, काय निर्णय घेतो ? याकडे आर्थिक विभागाचे लक्ष लागून राहिले आहे.