| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
सांगली जिल्हा स्वराज्य रिक्षा संघटनेने आपल्या सभासद रिक्षा चालकांच्या लेकींना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी "रिक्षा चालक सन्मान योजना" सुरु केली. हा खरा रचनात्मक उपक्रम असून घाम गाळून पोट भरणाऱ्या रिक्षा चालकांच्या लेकींना सायकल देऊन चांगली मदत केली आहे. आता आमच्या या लेकींनी अभ्यासाठी जास्त वेळ देऊन उत्तम गुणांनी पदवी घ्यावी. डाॅक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ आणि स्पर्धा परीक्षा गाजवून क्लास वन अधिकारी बनावे. असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. स्वराज्य रिक्षा संघटनेच्या 'रिक्षा चालक सन्मान' योजनेंतर्गत सभासदांच्या मुलींना सायकल वाटप करताना ते बोलत होते.
स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने इ.१० वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यींनींना सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये जिया साळुंखे सांगली ९२.२०%, उत्कर्षां चव्हाण सांगली, ७९%, श्रेया कदम आटपाडी ७७.६०%, साक्षी पवार खानापूर ७२.४०%. यशस्वी विद्यार्थ्यींनींचे अभिनंदन करुन पृथ्वीराज पाटील आणि जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील, उपाध्यक्ष राजू म्हेतर, नितीन वाघमारे, कार्याध्यक्ष अजित पाटील, सचिव साजिद अत्तार, खजिनदार सलीम कुरणे, सदस्य रमेश सावंत, प्रमोद होवाळे,सागर येसुगडे,साहेब पीर पिरजादे, बाळू जाधव, अमित घाडगे, हणमंत कांबळे, दिपक दळवी, संजय शिंदे, अजित नाईक, हणमंत मंडले, विलास जाधव, इम्तियाज मुजावर आदी सदस्य आणि पालक उपस्थित होते.