yuva MAharashtra प्रेमासाठी ओलांडली राज्याची सीमा... पण ?

प्रेमासाठी ओलांडली राज्याची सीमा... पण ?



| सांगली समाचार वृत्त |
रत्नागिरी - दि. १२ ऑगस्ट २०२४
'प्रेमासाठी वाट्टेल ते !' असे म्हणत टोकाचे पाऊल उचलणारे अनेक प्रेमी आपण पाहतो. यासंबंधीच्या अनेक घटना वृत्तपत्रातून व समाज माध्यमातून वाचतो. यामध्ये सफल झालेल्या प्रेम कहानी बरोबरच असफल झालेल्या प्रेमाची गोष्ट ही असते. अशीच एक गोष्ट भेटली ती मोहालीच्या एका तरुणी बरोबर...

ही तरुणी इन्स्टाग्रामवर नेहमीच एक्टिव असायची. एकदा तिला एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. आणि दोघांच्या मध्ये चॅटिंग सुरू झाले... (असा प्रकार ही नित्याचाच..) चॅटिंगवरील गप्पा फोनवर पोहोचल्या... दोघांचे स्वभाव जुळले (?) आणि दोघांनी लग्न करायचे ठरवले... पण तरुणाने अर घातली की तू रत्नागिरीस ये !... कारण तो रत्नागिरीचा...

सुरुवातीस तरुणीने नकार दिला. पण त्याचा हट्ट कायम होता. शेवटी ती प्रेमापुढे झुकली. तिने रत्नागिरीस येण्याचे मान्य केले. व घरी कोणासही काहीही न सांगता तिने रत्नागिरी गाठली. रत्नागिरीत आल्यानंतर तिने त्याला फोन लावला. पण 'तो नॉट रिचेबल !'... मेसेजही केले... पण 'नो रिप्लाय !' तिच्यापुढे प्रश्न पडला आता काय करायचे ?... कारण पॉकेटमध्ये मोजकेच पैसे. परत मोहालीला जायचे तर कसे ?... 


तिने निर्णय घेतला इथेच कुठेतरी नोकरी करून पैसे कमवू आणि मग गावी परतू... ती एका मोबाईल शॉपीमध्ये गेले व नोकरीची रिक्वेस्ट केले. परप्रांतीय मुलगी असल्याने मोबाईल शॉपीवाल्याने आधीच चौकशी करता सारा प्रकार समोर आला. त्याने तिला घेऊन पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना प्रेम कहानी सांगितली. पोलिसांनी मोबाईल रेकॉर्ड चेक केले, पण तो काही सापडला नाही. 

शेवटी पोलिसांनी तरुणीच्या घरी मोहालीला संपर्क साधला. तिच्या घरचेही तात्काळ रत्नागिरीस आले, व झाले गेले विसरून तिला घरी घेऊन गेले. एक अधुरी प्रेम कहाणी अशा रीतीने संपली. पण तरुणीचे सुभाग्य म्हणायला हवे, तिच्यासोबत काही अघटीत घडले नाही. तो मोबाईल शॉपीवाला प्रामाणिक निघाला. अन्यथा काहीही घरू शकले असते.

म्हणूनच तरुणींनी सोशल मीडियावरील अशा प्रकारापासून सावध राहायला हवे. स्वप्नांची ही खोटी दुनिया, कधी, कोणाला, कुठे, कसे, घेऊन जाईल... हे सांगता येत नाही...