| सांगली समाचार वृत्त |
बदलापूर - दि. २७ ऑगस्ट २०२४
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या बदलापूर येथे चिमुकलीवरील अत्याचाराचे घटना उघडकीस आल्यानंतर जो जनक्षोभ उसळला, त्याचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला उद्देशून अश्लील टिपणी केलेल्या शिवसेना (शिंदे गट) नेते वामन म्हात्रे यांच्यावर तब्बल 36 तासाने गुन्हा दाखल झाला. मात्र आता वामन म्हात्रे यांच्यावरील एफआयआरच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
बदलापूर येथे 20 ऑगस्ट रोजी आदर्श शाळेमध्ये दुर्घटनेवरून येथील नागरिक रस्त्यावर उतरले. या संबंधित शाळेची तोडफोड केल्यानंतर, आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची मागणी करीत एक गट बदलापूर रेल्वेच्या रुळावर उतरला. यावेळी पोलिसांनी जोरदार लाठी हल्ला करीत आंदोलकांना पांगवले. या साऱ्या घटना महाराष्ट्रभर पोहोचवलेल्या पत्रकारांवरील राग वामन म्हात्रे यांनी येथील एका महिला पत्रकारावर काढला.
"तू अशा बातम्या करतेस जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे." अशी अत्यंत लज्जास्पद व घृणास्पद वक्तव्य वामन म्हात्रे यांनी केल्याचा आरोप पत्रकाराने केला. या घटनेमुळे राज्यभरातील पत्रकारांमधून वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून दबाव निर्माण झाला. डबल 36 तासानंतर वामन मात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेत विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या महिला पत्रकाराला विविध हा आमिषे दाखवल्यानंतरही ती बधत नसल्याने, हे प्रकरण गुंडाळण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब सुरू झाला आहे. राज्यात कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये एखाद्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या सीसीटीएनएस या वेबसाईटवर नमूद केली जाते. पोलीस ठाण्यात न जाता राज्यातील सर्वसामान्य नागरिकाला ही माहिती सहज उपलब्ध व्हावी हा त्यामागील उद्देश असतो. मात्र 21 ऑगस्ट रोजी बदलापूर पोलीस ठाण्यात झालेल्या इतर गुन्ह्यांच्या यादीत, वामन म्हात्रे यांच्या विरोधातील एफआयआर ची नोंद सदर संकेतस्थळावर नसल्याचे दिसून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
याबाबत आता राज्यातील पत्रकार संघटनांनी राज्य सरकार व पोलीस यंत्रणेला धारेवर धरले आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना व संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावे व त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकारांमधून होत आहे.