| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्याच्या विरोधात कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. भामरागड मध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांनी मोठा घोटाळा केल्याचा टक्का त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबतच्या शासनाने चौकशी समितीने त्यांच्या विरोधात अहवाल दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आदिवासी विभागाच्या भामरागड आदिवासी लाभार्थ्यांना दुभत्या गाई म्हशीचे वाटप करण्यात आले यावेळी गुप्ता यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर दुप्पट पैसे जमा केले. मात्र नंतर ते दुसऱ्या खात्यावर वर्ग केले, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
आयुक्त शुभम गुप्ता यांनी मात्र या आरोपाचा इन्कार केला असून, माझी छबी बदनाम करण्यासाठीचा हा कट असल्याचे म्हटले आहे. सध्या 20 आदिवासी विभागाच्या अहवालाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाने सुरू केले असून हा संपूर्ण गोपनीय अहवाल पुढील कारवाईसाठी दिल्लीतील डीओपीटीकडे पाठवण्यात येणार आहे. यावर आता काय कारवाई होणार याबाबत जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे. मात्र सांगली येथे दाखल झाल्यानंतर गुप्ता यांनी ज्या पद्धतीने कामकाज सुरू केले आहे, त्याबद्दल जनतेमध्ये त्यांच्याबाबत आदरच निर्माण झाला आहे. मात्र या आदराला या अहवालाने व बातमीने छेद देण्याचे काम केले आहे.