| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ ऑगस्ट २०२४
सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना महिना पंधराशे रुपये देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रक्षाबंधनापूर्वी मुख्यमंत्री आपल्या लाडक्या बहिणींना ही भाऊबीज भेट देणार असल्याचे जाहीर झाले आहे. नुकत्याच आलेल्या एका माहितीनुसार महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याच दरम्यान राज्यातील महिलांसाठी तीन एक आनंदाची बातमी विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली असून राज्यातील दहा लाखाहून अधिक महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी मोलकरीण योजना' अमलात येणार असून या महिलांना दहा हजार रुपयांचा संसार सेट भेट देणार असल्याचे व यासाठीची अधिसूचना लवकरच प्रसिद्धी केली जाईल असे सांगितले जात आहे.
अर्थात याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. तसेच ज्या महिलांना 'लाडकी बहीण योजनेअंतर्गत' लाभ मिळाला आहे, त्या मोलकरीण महिलांनाही हा लाभ मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान राज्यात दहा लाखाहून अधिक नोंदणीकृत मोलकरीण महिलांची संख्या असून नोंदणीकृत मोलकरणीच यासाठी लाभार्थी ठरणार असल्याचे समजते.