| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑगस्ट २०२४
सांगलीत खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी संजय माने याने काल संजय नगर येथील अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होताच, अवघ्या दीड तासात संजय माने यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, 2011 साली सांगलीतील प्रिया हॉटेल समोर संजय माने यांनी एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याला 14 वर्षांची शिक्षा झाली असून, तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला आहे. संजय नगर येथील एका अल्पवयीन मुलीशी त्याची मैत्री ही झाली होती. त्यावेळेस 'तू मला आवडतेस' असे सांगत तिचा विनयभंग केला होता. मात्र भीतीमुळे याबाबत पीडित मुलीने कुठे वाचता केले नव्हती. काल रात्री त्याने पीडित मुलीला बोलावून जबरदस्तीने आपल्या घरात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याची कुठे वाचता केलेस तर तुला सोडणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली होती त्यामुळे सदर मुलीने कोणास काही सांगितले नव्हते. मात्र आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली.
यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने याला देऊ घाट येथून ताब्यात घेतले. आता पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान हा प्रकार बाहेर उघड केस आल्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आणि भाजप नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलिसांची भेट घेऊन आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केली आहे.