yuva MAharashtra माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून मिरज-सांगली-बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू !

माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नातून मिरज-सांगली-बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी रेल मंत्री व भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्टके अध्यक्ष श्री कैलासजी वर्मा यांच्याकडे केलेल्या आग्रही मागणीमुळे रेल्वे बोर्डाने मिरज-बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. या गाडीला सांगली जिल्ह्यात सांगली व किर्लोस्करवाडी या दोन रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा आग्रह श्री. संजयकाका पाटील यांनी केला होता.

महाराष्ट्र भाजपा रेल प्रकोष्टचे अध्यक्ष श्री. कैलासजी वर्मा, मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व पश्चिम महाराष्ट्र रेल्वे ग्रुपचे श्री. उमेश शहा व झोनल सल्लागार समितीचे श्री. सुकुमार पाटील यांनी मिरज-बिकानेर गाडी सुरू होण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते. रेल्वे अधिकार्‍यांसोबत बैठक आयोजित करून पाठपुरावा केला होता. मुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रातून गुजरात, राजस्थान व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना सांगली रेल्वे स्टेशन येथून या रेल्वेने प्रवास करता येईल. 


तासगाव, कडेगाव, पलूस, खानापूर, वाळवा, आटपाडी तालुक्यातील नागरिकांना आता गुजरात राजस्थानला जाण्यासाठी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन वरून मिरज बिकानेर एक्सप्रेस रेल्वे पकडता येईल. सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक लोकांनी सांगली व तिरस्कार या रेल्वे स्टेशनवर प्रवास करावा असे आवाहन माझे खासदार श्री. संजयकाका पाटील यांनी केले आहे.

मिरज सांगली बिकानेर सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडी क्र. 20476 ही प्रत्येक मंगळवारी मिरज रेल्वे स्टेशन वरून दुपारी 2.25 वाजता सुटून सांगली रेल्वे स्टेशनवर 2.35 वा येईल. त्यानंतर ती 2.40 वाजता सांगलीतून प्रस्थान करेल. किर्लोस्करवाडी येथे ही रेल्वे तीन वाजता येईल व तिथून पुढे बिकानेर कडे रवाना होईल. तर ही सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे क्रमांक 20475 बिकानेर वरून दर सोमवारी सकाळी 7. 30 वाजता सुटून मिरजेकडे प्रस्थान करेल.

माजी खासदार श्री. संजयकाका पाटील यांनी सांगली जिल्ह्याला देशाच्या विविध भागाशी जोडण्याकरिता ज्या मागण्या केल्या होत्या, तसेच त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे, मिरज बिकानेर हे का रेल्वे मंजूर होऊन सुरू होत आहे. 

मिरज बिकानेर सुपर फास्ट एक्सप्रेस चे उद्घाटन रेल्वे स्टेशनवर सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते होईल. तर सांगली रेल्वे स्टेशन येथे आ. सुधीरदादा गाडगीळ, माजी खासदार श्री. संजय काका पाटील, श्री. प्रकाश ढंग, सौ. नीताताई केळकर यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात येईल. किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर श्री संग्राम देशमुख हे या रेल्वेचे स्वागत करतील.