Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या पदावर त्रिदेवी, कार्यकर्तृत्वाने बनत आहेत चर्चेचा विषय !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ ऑगस्ट २०२४
'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी' अशी आपल्याकडे एक मराठी म्हण आहे
 काळाची गरज म्हणून बंधनांचे श्रृंखला तोडत उंबरठा ओलांडलेल्या महिलांनी सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. असे एकही क्षेत्र सध्या नाही, जिथे महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले नाही. उद्योग असो व्यवसाय असो किंवा राजकारण... येथे अनेक महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. प्रशासनात तर महिलांचा वावर अगदी सहजगत्या दिसून येतो. परंतु वरिष्ठ पातळीवर खूप कमी महिलांना संधी मिळत असल्याची तक्रार अनेकांकडून होत असते...

या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्राच्या गाड्याची दोरी तीन महिलांच्या हाती एकवटली आहे. यातील पहिल्या म्हणजे दोनच दिवसांपूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक म्हणून नेमणूक झालेल्या शोमिता बिश्वास. तत्पूर्वी पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांनी आपले कार्य कर्तृत्व सिद्ध केले आहे. तर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही आपल्या अनेक निर्णयांनी आपले महत्त्व अधोरेखित केले आहे या तिन्ही महिला आयएएस असून, यापूर्वी त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत सक्षमपणे पार पाडलेल्या आहेत. 

सध्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत या 'तीन देवी' कार्यरत असून, त्यांची कार्यपद्धती आणि निर्णय क्षमता हा कौतुकाचा विषय ठरत आहे. महायुतीतील अदिती करे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या तीन महत्त्वाच्या पदांवर महिलांची नेमणूक केल्यामुळे, विरोधकांना ही चपराग समजली जाते.