yuva MAharashtra पोलीसापासून वाचण्यासाठी हेल्मेट घातले, पण तरीही होणार आता दंड ? वाचा इनसाइड स्टोरी !

पोलीसापासून वाचण्यासाठी हेल्मेट घातले, पण तरीही होणार आता दंड ? वाचा इनसाइड स्टोरी !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १४ ऑगस्ट २०२४
रस्ते अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी, केंद्र सरकारने दुचाकीधारकांना हेल्मेटची सक्ती केली. अगदी मागे बसणाऱ्या व्यक्तींनाही हेल्मेट अत्यावश्यक केले. परंतु या नियमातून पळवाट काढण्यासाठी काही महाभाग रस्त्यावरील स्वस्तात मिळणारे हेल्मेट पोलिसांना दाखवण्यासाठी परिधान करीत असतात. परंतु ही पळवाटच संबंधितांना मृत्यूच्या महामार्गावर घेऊन जात असते. हे लक्षात आल्यानंतर आता, केंद्र सरकारने याबाबत कडक कायदा केला आहे.

यापुढे आपण परिधान केलेल्या हेल्मेट बाबत वाहतूक पोलिसांना शंका आली, आणि त्यांनी तपासणी केल्यानंतर सदरचे हेल्मेट अधिकृत आहे आयएसआय मार्क नसतील तर तुम्हाला दंड होऊ शकतो. रस्त्यावरील घडणाऱ्या अपघातांची चौकशी करीत असताना ही बाब पोलिसांच्या लक्षात आली, याचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला. रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचे हेल्मेट हे रस्ते अपघातात मृत्यू आणि जखमी होण्याचे प्रमुख कारण ठरत आहेत. 


इतकेच नव्हे तर आता दुर्दैवाने एखाद्या रस्ता अपघातात मृत्युमुखी पावलेल्या हेल्मेट अधिकृत आयएसआय मार्क नसेल तर अपघाती विमा चा लाभ संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना मिळणार नाही. याबाबत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व आयएसआय नोंदणी शिवाय हेल्मेट विकणाऱ्या वर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. डीआयएस लायसन्स आणि बनावट आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट तयार करून विकणे कायद्याने गुन्हा आहे निकृष्ट दर्जाचे हेल्मेट बनवणाऱ्या आणि बेकरी करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून भारतात बनवलेल्या औद्योगिक उत्पादनांना आयएसआय चिन्ह दिले जातं हे उत्पादन भारतीय मानक ब्युरो यांनी विकसित केलेल्या भारतीय मानकांशी सुसंगत आहे की नाही याची तपासणी केली जाते. रस्त्यावरील किंवा अगदी दुकानात विक्रीसाठी असलेले हे हेल्मेट अधिकृत आयएसआय नसेल तर, संबंधित विक्रेत्याला मोठ्या दंड भरावा लागू शकतो. आणि पोलिसांनी पकडल्यानंतर तुम्हालाही. त्यामुळे यापुढे हेल्मेट खरेदी करीत असताना ते अधिकृत आहे का याची खात्री करूनच ते खरेदी करावे.