Sangli Samachar

The Janshakti News

संपूर्ण गावावर सांगितला वक्फ बोर्डाने दावा, हिंदूंना तात्काळ गाव सोडण्याच्या फतव्याला पाटणा उच्च न्यायालयाने दिली स्थगिती !


| सांगली समाचार वृत्त |
पाटणा - दि. २८ ऑगस्ट २०२४
बिहार येथील राजधानी पाटणा सचिवालयापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोविंदपुर या हिंदूबहुल गावावर वक्फ बोर्डाने हक्क सांगून गावातील सर्व हिंदूंना गाव सोडण्याचा फतवा काढला. प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात पोहोचले. न्यायाधीशांनी वक्फ बोर्डाकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी केली तेव्हा बोर्डाच्या वकिलाकडून अशी कागदपत्रे नसल्याचा खुलासा केला. तेव्हा संतापलेल्या खंडपीठाने वक्फ बोर्डाच्या या आदेशाला स्थगिती दिली आहे.

बिहार मधील पाटणा या राजधानीच्या शहरापासून जवळच असलेल्या भगवान विष्णू यांच्या नावावर असलेले हे गाव आपले असल्याचा दावा सुन्नी वक्फ बोर्डाने करून, गावातील सर्व हिंदूंना महिनाभरात निघून जाण्याचा फतवा काढला. बोर्डाच्या या तुघलकी आदेशाने गावकरी हैराण झाले. या गावात 95 टक्के हिंदूंची लोकसंख्या आहे. 


या गावाच्या शेजारी एक मझार असून ती मजाक आणि आजूबाजूच्या परिसरापासून सुरू होणारी संपूर्ण जमीन स्मशानभूमीची असल्याचे वक्फ बोर्डाचे मत आहे. परंतु सुरुवातीपासून येथे कधीही भूमी व मजार अस्तित्वात नव्हती असे गावातील हिंदूंचे मत आहे.

वक्फ बोर्ड आणि गावकरी यांच्यातील हा वाद विकोपाला गेल्यानंतर गावकऱ्यांनी जमिनीच्या मालकीची पडताळणी करण्यासाठी पाटणा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला तेव्हा, जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी ही जमीन वक्फ बोर्डाची नसल्याची सांगून ती तिथे राहणाऱ्या ग्रामस्थांचे असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. 

त्यानंतर हे प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात पोहोचले. योग्य त्या कागदपत्रासह वकिलामार्फत गावकऱ्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर कोर्टाने वक्फ बोर्डाकडे योग्य त्या कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा याबाबत वक्फ बोर्डाचे वकील समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे पाटणा उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली.

दरम्यान वक्फ बोर्डाची चाललेली आरेरावी केवळ बिहार राज्यातच नसून उत्तर भारतातील अनेक गावात हीच परिस्थिती असल्याने हिंदू समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.