yuva MAharashtra पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात घुसलेल्या तिघा तरुणांमुळे संशयकल्लोळ अन् हलकल्ळोल !

पुण्यात महापालिकेच्या रुग्णालयात घुसलेल्या तिघा तरुणांमुळे संशयकल्लोळ अन् हलकल्ळोल !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १६ ऑगस्ट २०२४
सांस्कृतिक-शैक्षणिक- धर्माभिमानी अशी ओळख असलेल्या पुण्याची सध्या अवस्था अगदी याच्या उलट झालेली आहे. इथली तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचे विदारक चित्र पुण्यात अनेक ठिकाणी सापडलेल्या ड्रग्जमुळे चितारले गेले. इथं शिक्षणासाठी येणारे तरुण-तरुणी खरंच शिक्षणासाठीच येतात का ? असा प्रश्न त्यांच्या उथळ वागण्यावरून पडतो. वास्तविक कोणी कसे वागावे ? कोणते कपडे परिधान करावेत ? हे आणि असे प्रश्न या पार्श्वभूमीवर विचारले जाऊच नयेत. धर्माभिमानी या शब्दाची व्याख्या सध्याच्या तरुण-तरुणींच्या डिक्शनरीमध्ये वेगळीच असावी असे प्रसंग पुण्यात अनेकदा घडतात. शांत-संयमी ओळखही आता पुण्यात सापडणाऱ्या दहशतवादाची ओळख घेऊन आलेल्यांमुळे विस्मृतीत जाण्याची शक्यता आहे.

याचाच दाखला देणाऱ्या एका घटनेची घेऊन बुधवारचा सूर्य पुण्याच्या क्षितिजावर प्रकट झाला. मंगळवार पेठेतील पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये तीन संशयित दहशतवादी घुसल्याची बातमी हा हा म्हणतात पुण्यात वाऱ्यासारखे पसरली. आणि सर्वांची छाती दडपली. परंतु हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी खबरदारी घेत टाकळीने या तिघा संशयितांना एका खोलीत जेरबंद केलं. पोलीस कंट्रोल रूमला कळविण्यात आलं आणि पोलिसांच्या सायरन वाजवीत आलेल्या गाड्या दवाखान्याच्या दरवाज्यात उभ्या राहिल्या. दवाखान्यातील रुग्ण आणि नातेवाईकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. कालच पोलिसांनी तीन संशयितांचे फोटो रुग्णालय प्रशासनाला पाठवले होते. उपचारासाठी आलेले हे तीन तरुण, फोटोतील असल्याचा संशय आल्याने रुग्णालय प्रशासनाने तात्काळ ही माहिती पोलिसांना कळविले आणि सुत्रे फिरली.


या तिघा संशयतांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्याच्या लोहिया नगर परिसरात राहणारे हे तरुण मुळचे बिहारचे असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले. अवघ्या काहीच दिवसापूर्वी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली होती. त्यामुळे या संशयितांच्या बाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या प्रशासनाने दाखवलेली समय सूचकता यासाठी खूप महत्त्वाची म्हटली पाहिजे. जर प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली नसती तर ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. परंतु सध्या तरी या तरुणांना ताब्यात घेतल्यामुळे जर तुमच्या शंकांना अर्धविराम लागला आहे. कारण पोलीस तपासात काय निष्पन्न होते ? आणि या तरुणांचे लागेबांधे असलेले आणखी किती संशयित तरुण पुण्यात वावरत आहेत ? हे प्रश्न मागे उरतातच..