yuva MAharashtra मनपाच्या मालकीचे खुले भूखंड व मिळकतीबाबत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची महत्त्वपूर्ण माहिती !

मनपाच्या मालकीचे खुले भूखंड व मिळकतीबाबत महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची महत्त्वपूर्ण माहिती !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
महापालिकेच्या मालकीचे खुले भूखंड आणि मिळकती बाबत रेकार्ड तपासून रजिस्टर मध्ये नोंद घेण्याची सुरुवात केली आहे. तत्कालीन सांगली, मिरज नगरपालिका आणि कुपवाड नगरपरिषद इत्यादी मिळून सन 1998 मध्ये महापालिका झाली आहे. तीन नगरपालिका मिळून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका झाल्याने रेकार्ड वेगवेगळे होते. त्याचे एकत्रिकरण करून अद्ययावत पद्धतीने जतन करणे आणि प्रत्यक्ष जागेवरील परिस्थिती नुसार रेकॉर्ड रजिस्टर मध्ये नोंद करण्याची कार्यवाही होणे आवश्यक होते, आता हे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे.

अपुऱा कर्मचारी वर्ग आणि साधनसामग्रीमुळे ते शक्य झाले नव्हते, ही बाब मा आयुक्त यांच्या निदर्शनास आले वरून मालमत्ता विभाग कडील खुला भूखंड बरोबर अन्य महापालिका मालकीच्या मिळकतीचे रेकॉर्ड अद्यावत करून रजिस्टर मध्ये नोंदी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 


त्यासाठी एक मुख्य नोंदणी अधिकारी, अन्य पाच सहा. नोंदणी अधिकारी व सेवानिवृत्त महसूल विभागाचे नायब तहसीलदार, तलाठी यांची तात्पुरती नियुक्ती करून महसूल दप्तरी नोंदी तपासणी करून महापालिकेच्या मिळकती शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर नगररचना, कर, बांधकाम, आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून तिन्ही शहरातील सर्व वार्डनिहाय खुले भूखंड, मनपाच्या इमारतीबाबत माहिती संकलित करून, सदर भूखंडास कपाऊंड , महापालिका मालकीचे फलक आहे अगर कसे यांची माहिती घेऊन, त्याची तपासणी रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येत आहे.

सदरची सर्व कागदोपत्री माहिती संकलित करून महसूल सदरी असलेले रेकार्ड बरोबर तपासणीअंती रजिस्टर मध्ये करण्यात येणार आहे. संगणक प्रणालीव्दारे सदरची माहिती संग्रही होणार असल्याने हे रेकार्ड महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडील मिळकती बाबतचे रेकॉर्ड अद्यावत होणार आहे.