Sangli Samachar

The Janshakti News

ऑलिंपिकवीर स्वप्निल कुसळे याला महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २ ऑगस्ट २०२४
ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव यांच्यानंतर देशासाठी पदक मिळवणाऱ्या नेमबाज स्वप्निल कुसाळे याला एकनाथ शिंदे यांनी एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे. कुसाळे याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल तरी पोझिशनमध्ये कांस्यपदकाचे कमाई केली आहे.

स्वप्निलच्या या चमकदार कामगिरीचा सर्वत्र कौतुक होत असून शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलच्या घरी दूरध्वनी वरून संपर्क करीत, त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले आणि एक कोटी रुपये देत असल्याचे जाहीर केले. स्वप्निल हा महाराष्ट्राचा अभिमान आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्निलचे वडील सुरेश कुसाळे यांना दिला.


कुसाळे कुटुंबियांच्या पाठिंबामुळे स्वप्निल या यशापर्यंत पोहोचू शकला आहे. त्याच्या गेल्या बारा वर्षाच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असे यश मिळाले आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांकडून शालेय जीवना त पासूनच नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान स्वप्निल कुसळे यांचे जन्मगाव कांबळेवाडी येथे नागरिकांतून या यशाबद्दल जल्लोष करण्यात येत आहे. स्वप्निल परतल्यानंतर कोल्हापूर ते कांबळेवाडी दरम्यान भव्य रॅली काढण्यात येणार असल्याची तयारीही गावकऱ्यांकडून सुरू आहे.