| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
महापालिकेचा तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह आयोजित कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थी, एसडीए अकॅडमीने देशभक्तीपर आधारित नृत्याविष्कार
सादर केले.
आयुक्त शुभम गुप्ता यांच्याहस्ते आणि उपायुक्त वैभव साबळे, संजीव ओहोळ यांच्या उपस्थितीत या तिरंगा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, विद्या घुगे, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, शिक्षण मंडळाचे सतीश कांबळे, गजानन बुचडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांच्या देशभक्तीपर गीताने करण्यात आली. यानंतर सुमित नृत्य अकॅडमीकडून वंदे मातरम् या गीतावर आधारित नृत्याविष्कार सादर करण्यात आला. शाळा क्रमांक 17 चे विद्यार्थी ग्रुप डान्स सादर झाला. या दरम्यान, आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, विधवा पत्नी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मिरजेतील शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय जोशी यानी केले.
कार्यक्रमाचे व्हिडिओ...
1)...
2)...
3)...
4)...