yuva MAharashtra ७८ ‌‌‌व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे स्वातंत्र्य दिन संपन्न !

७८ ‌‌‌व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर्फे स्वातंत्र्य दिन संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
७८ ‌‌‌व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली जिल्हा कार्यालय या ठिकाणी स्वातंत्र्यदिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने झेंडावंदन करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला .

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हा उपाध्यक्ष मा.शितल खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
यावेळी शितल खाडे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले व आभार मानले


यावेळी युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार,सांगली शहराध्यक्ष सागर घोडके,मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे, तानाजी गडदे,उत्तम कांबळे,मुश्ताक रंगरेज,आयुब बारगिर, महालिंग हेगडे यांच्यासह सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.