yuva MAharashtra 'प्रतिष्ठा' पुरस्काराबद्दल कर्मवीर पतसंस्थेतर्फे रावसाहेब पाटील व मनोहर सारडा यांचा ह्रद्य सत्कार !

'प्रतिष्ठा' पुरस्काराबद्दल कर्मवीर पतसंस्थेतर्फे रावसाहेब पाटील व मनोहर सारडा यांचा ह्रद्य सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑगस्ट २०२४
कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब जिंकून पाटील यांना सहकार भूषण, तर प्रसिद्ध उद्योगपती मनोहर सारडा यांना उदयोग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील कर्मवीर पतसंस्थेमध्ये ह्रद्य सत्कार करण्यात आला. येथील प्रतिष्ठान न्यूज तर्फे समाजात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना प्रतिवर्षी विविध पुरस्कार देण्यात येतात. यावेळी या पुरस्कारात रावसाहेब जनगण पाटील व मनोहर सारडा यांचा पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश होता.

यावेळी सत्काराला उत्तर देताना मनोहर चालला म्हणाले की कर्मवीर पतसंस्था ही एक आदर्श पतसंस्था आहे. या वास्तूमध्ये प्रवेश केल्याबरोबर वास्तुच सांगते या संस्थेचे वैभव. ही संस्था नजीकच्या काळात दोन हजार कोटींचे ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करेल.


आपल्या मनोगत बोलताना संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले की मनोहर सरडा उत्तम व्यापार करतात तसेच व्यापारी वर्गाला त्यांचे सातत्याने मार्गदर्शन असते, यासाठी त्यांना कर्मवीर उद्योग भूषण हा पुरस्कार डॉ. . मार्शलकर सरांच्या हस्ते दिला होता. मला मिळालेला सहकार भूषण पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेमुळे मिळालेला आहे, त्यामुळे हा पुरस्कार मी कर्मवीर पस्त संस्थेलाच देत आहे.

ॲड. एस. पी. मगदूम यांनी मनोहर सारडा यांचा तर रावसाहेब पाटील यांचा सत्कार डॉ. अशोक सकळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. रमेश ढळू, वसंतराव नवले, ए. के. नाना चौगुले, डॉ. नरेंद्र खाडे, श्रीमती भारती चोपडे, लालासो थोटे, डॉ. मोडके पाटील, डॉ. चेतन पाटील, जिव्हाळा ग्रुपचे आर. बी. पाटील, लक्ष्मण नवलाई, विजय तेली, प्रमोद लाड, शीतल पाटील, रमाकांत घोडके, सुतार, व सर्व कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.