yuva MAharashtra अत्याधुनिक लालपरीच्या आगमनाने महामंडळावर नवा आर्थिक सूर्योदय होणार !

अत्याधुनिक लालपरीच्या आगमनाने महामंडळावर नवा आर्थिक सूर्योदय होणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ ऑगस्ट २०२४
डब्बा बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाने एक चांगली बातमी दिली असून महामंडळ आपल्यात ताफ्यात तब्बल 2475 अत्याधुनिक बस बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट वाहन क्षेत्रातील जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या बलाढ्य अशोक लेलँड कंपनीला दिले आहे.

सध्या प्रवाशांच्या सेवेत 15000 बसेस धावतात. यापैकी कित्येक बसेस नादुरुस्त असून, काही बसेस तर अगदी डब्बा झाले आहेत. त्यामुळे प्रवाशातून नाराजी व्यक्त होत होते. काहींनी तर खाजगी बसेसकडे पुन्हा मोर्चा वळवला होता. त्यामुळे महामंडळाला आधार होता तो, 50% सवलतीतील महिला वर्गाचा. त्यांच्याकडूनही महामंडळाला खडे बोल ऐकावे लागत होते.


या अत्याधुनिक बस या बसेस टू बाय टू च्या असून एका बसचा अंदाजे खर्च 38. 36 लाख रुपये आहे. या बसेसच्या दर्जा सी एम व्ही आर स्टॅंडर्ड चा आहे. नव्या तंत्राने तसेच प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन महामंडळाच्या गरजेनुरूप त्या बांधण्यात येणार आहेत.

कोरोना आणि त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गांना 50 टक्के सवलत दिल्याने, डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाला या 50 टक्क्याच्या प्रवर्गातील महिलांमुळे आधार मिळाला, आणि एसटी बस कडे प्रवासी वळले. महामंडळाची परिस्थिती थोडीशी सुधारली. परंतु नादुरुस्त बसेसमुळे हा वर्ग हे नाराज होत होता. यासाठी बसच्या ताफ्यात नव्या बसेसची मागणी होत होती. ही मागणी आता पूर्ण होणार असून, महामंडळाची आर्थिक गाडीही योग्य मार्गावर येण्यास हातभार लागणार आहे.