yuva MAharashtra राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदारावर अखेर गुन्हा दाखल !

राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदारावर अखेर गुन्हा दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ ऑगस्ट २०२४
संपूर्ण राज्यात संतापाचा उद्रेकास कारणीभूत झालेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या कंत्राटदाराने उभारलेला होता त्याच्यावर भारतीय न्याय संहिताच्या अनेक कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अधिक माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गतवर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. पंधरा फूट उंचीचा समुद्रा आणि 28 फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी याची रचना होती. आठच महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला हा पुतळा पर्यटन आणि शिवप्रेमींचे आकर्षण केंद्र बनलेला होता.

सोमवारी दुपारी अचानक हा पुतळा कोसळला आणि शिवप्रेमी व विरोधी पक्षातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. अनेक ठिकाणी मोर्चे आणि निषेध सभा घेण्यात आल्या. त्यामुळे हा पुतळा उभारलेल्या कंत्राटदार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय अन्याय संहितेच्या भ्रष्टाचार, फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर एफ आर आय नोंदवण्यात आला असून यामध्ये पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच संरचनेत वापरण्यात आलेले नट व बोर्ड गंजलेले आढळले. पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी यापूर्वी चिंता व्यक्त केले होती. याबाबत मालवण विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातीलव सहाय्यक अभियंत्याने 20 ऑगस्ट रोजी दिलेल्या इशाऱ्यावरही कोणतीचश प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नव्हती.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले की, गंजलेल्या नटबोल्टमुळे पुतळ्याच्या स्थिरतेला धोका निर्माण झाला होता, पुतळा वापरण्यासाठी वापरलेले स्टील अल्पावधीतच गंजू लागले होते. ही बाब नौदल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती तरीही या इशाराकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले.

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनीही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षाने तर महाराष्ट्र शासनाला व एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले होते. या सर्वांचे दखल घेत अखेर महाराष्ट्र शासनाने हा पुतळा उभारलेल्या जयदीप आपटे याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.