| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
मातंग, बौद्ध, मराठा आणि मुस्लिम समाज एकत्र आला तर राजकारणात राखीव जागा मिळवणे अवघड नाही असे मत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते सांगली येथील कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले की,, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार साहित्यरत्न भाऊ साठे यांनी मोठ्या प्रमाणावर केला आहे. त्यांचा विचार माझ्या जगण्याचे गरज आहे. अण्णाभाऊंचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला, तेथे त्यांना अभिवादन करताना मला आनंद होत आहे. आंबेडकर परिवाराच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो.
महात्मा गांधी यांच्याबरोबर झालेल्या पुणे करारानुसार राजकारणामध्ये असणाऱ्या राखीव जागा या आम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणात मिळत नाहीत त्या मिळवायच्या असतील तर प्रमुख्याने बौद्ध मातंग मराठा आणि मुस्लिमांनी एकत्र येण्याचे गरज आहे तरच या हक्काच्या राखीव जागा आपल्याला मिळवता येतील आणि समाजाचे भले साधता येईल, असेही डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी बोलून दाखवले.
यावेळी डॉ. नामदेव कस्तुरे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड, वैभव दबडे, सुभाष माने, भिक्खू ज्ञानज्योती, आचार्य भिक्खू गोविंदा, निर्मला घाडगे, चंद्रकांत खरात, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे, आकाश तिवडे, प्रमोद रास्ते, मिलिंद कांबळे, विशाल मोरे, संतोष आवळे, संतोष सदामते, तानाजी आवळे, कपिल आवळे, नितीन केकचे, शिवाजी पांढरे, निलेश मोहिते, अजय माने, ज्ञानेश्वर केंगार, प्रवीण चौगुले, आवास सुवासे, शितल वाघमारे, गणेश खिलारे, सिताराम ऐवुळे, प्रशांत ढंग, यांच्यासह सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.