yuva MAharashtra शंभर फुटीवरील नवीन डिव्हायडर की, भाजी विक्रेत्यांच्या सोयीसाठी कचराकुंडी ?

शंभर फुटीवरील नवीन डिव्हायडर की, भाजी विक्रेत्यांच्या सोयीसाठी कचराकुंडी ?


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑगस्ट २०२४
सांगली शहरात विविध ठिकाणी आठवडा बाजार भरवले जातात. बाजार संपल्यानंतर संध्याकाळी विक्रीचे, त्याच ठिकाणी आपल्याकडे शिल्लक भाजीचा कचरा अस्ताव्यस्तरीतीने टाकून जातात. ज्याचा महापालिका कचरा व्यवस्थापन विभागाला तर त्रास होतोच, पण त्याहीपेक्षा याचा त्रास नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे या कचऱ्याबद्दल नागरिकाचे नेहमीच नाराजी व्यक्त होत असते. महापालिकेनेही अनेक वेळा या भाजीविक्रेत्यांना आपल्याकडे कचरा एकाच ठिकाणी जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु भाजी विक्रेत्याकडून जणू या सूचनांना त्याच कचऱ्यात टाकले जाते. 

असाच प्रकार 100 फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूम समोर येईल डिव्हायडर मध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीचा कचरा जमा होत आहे. डिव्हायडर होण्यापूर्वी रस्त्यावर येथे बसणाऱ्या बाह्य विक्रेत्यांकडून रोज भाजीचा कचरा अस्ताव्यस्त रीतीने टाकला जात होता. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, पावसाच्या पाण्याने भाजीचा कचरा लवकर कुजतो. महापालिकेकडून हा कचरा तात्काळ उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. या भागातील नागरिकांनी ही बाब या परिसरातील नगरसेवकांच्या कानावरही घातली. परंतु सध्या प्रशासन राज्य असल्याने, नगरसेवकांनी स्वच्छता विभागाला येथील भाजीचा कचरा उचलण्यासाठी सूचना करूनही, 'कमी कर्मचाऱ्यांची कारणे देऊन' कचरा उठाव करण्यात टाळाटाळ होते.


दरम्यान सध्या शंभर फुटी मार्गावर डिव्हायडर बसवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये झाडांची रोपे लावण्याची महापालिकेची योजना आहे. परंतु अद्याप या डिव्हायडरचे काम अपूर्ण असल्याने यामध्ये माती टाकण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी बसणाऱ्या मागील विक्रेत्यांनी आपल्याकडील भाजीचा कचरा याच डिव्हायडरमध्ये टाकण्यास सुरुवात केली आहे. आणि म्हणूनच नागरिक कुठून प्रश्न विचारला जात आहे की डिव्हायडर आहे की भाजीविक्रेत्यासाठी भाजी कचराकुंडी ? तरीही महापालिका स्वच्छता विभागाकडून कचरा उठावा बाबत कोणतीही हालचाल केली जात नसल्याने, नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.


---------------‐‐-------------------------------