Sangli Samachar

The Janshakti News

राज ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ ऑगस्ट २०२४
राज ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने संतप्त मनसे सैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, मात्र ते शक्य न झाल्यामुळे त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या प्रकरणातील तणावामुळे राष्ट्रवादीच्याच जय मालोकर याचा बळी गेला आहे. या घटनेस मनसे प्रमुख राज ठाकरे हीच जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे.

यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले की हत्यारे घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून त्यांची गाडी फोडण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांवर असा प्रसंग यायला नको परंतु विधिमंडळाच्या सदस्या बाबतीतच असा प्रसंग येत असेल तर ही चिंतनीय बाब असून या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला प्रवृत्त करणारे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे अशी मागणी ही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


राज ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्रात राडा संस्कृती निर्माण झाली असून तरुण पिढी बेरोजगारीकडे झोपली असल्याचा आरोप करून उमेश पाटील पुढे म्हणाले की, एका कार्यकर्त्याला हल्ला करायला प्रवृत्त करणे आणि त्यात त्या तरुणाचा मृत्यू होणे हा सदोष मनुष्यधाचा गुन्हा आहे कायदा हा सर्वांना सारखा आहे त्यामुळे राज ठाकरे यांना कायदा वेगळा असता कामा नये म्हणूनच त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करीत असल्याचे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.