| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ ऑगस्ट २०२४
देशातील सर्वच समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक असल्याचा मुद्दा खा. राहुलजी गांधी यांनी लोकसभेत मांडताना मनुवादी चातुर्वर्ण्य विचारधारेचे भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी खा. राहूलजीना जात विचारुन त्यांचा अपमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर खा. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचे समर्थन केले आहे ही बाब देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. एकीकडे संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथविधी आणि दुसरीकडे जातीधर्माच्या नावावर तेढ निर्माण करणे हे देशविघातक आहे. या प्रवृत्तीला विरोध आणि निषेध करण्यासाठी राज्यभर काँग्रेस पक्षाचे निषेध आंदोलन सुरू आहे.
सांगली जिल्हा ग्रामीण व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दि.२ ऑगस्ट २०२४ रोजी स. ११ वा. काँग्रेस भवन सांगली येथे भाजपा सरकारचा निषेध आंदोलन माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शना नुसार करण्यात येणार असल्याचे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनात सांगली जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते, आजी माजी खासदार, आमदार, माजी मंत्री, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, ब्लाॅक अध्यक्ष, विभाग व सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.