| सांगली समाचार वृत्त |
पालघर - दि. ३० ऑगस्ट २०२४
"छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी फक्त नाव नाही, ते आमचे आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मान झुकवून शिवाजी महाराजांच्या चरणांवर डोके ठेवून माफी मागतो", अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पालघरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली. मोदी म्हणाले, भारताचे महानसुपुत्र वीर सावरकर यांना शिव्या दिल्या जातात. ते माफी मागत नाहीत. त्यांची कोर्टात जायची तयारी असते. मात्र, आमचे संस्कार वेगळे आहेत.
शिवाजी महाराजांच्या चरणाव डोकं ठेवून माफी मागतो. जे लोक शिवाजी महाराजांना आराध्य दैवत त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवताची पूजा करणारांची माफी मागतो. आमच्यासाठी आराध्य दैवतेपेक्षा काहीही मोठे नाही, असे मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा दुर्घटना प्रकरणी माफी मागितल्यानंतर याबाबत सुरू झालेले राजकारण थांबते, ती पुन्हा पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून ते हे वाढते, हे लवकरच कळून येईल.