| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑगस्ट २०२४
लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी
मोर्चेकऱ्यांनी केला महायुती शासनाचा आणि आरोपींचा निषेध..
बदलापूर (ठाणे) येथील आदर्श विद्यामंदीरात चार वर्षीय चिमुकल्या दोन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. सांगली जिल्ह्य़ातही या अमानुष अत्याचाराबद्दल तीव्र असंतोष धुमसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगली शहरात महविकास आघाडी, पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना व संवेदनशील सांगलीकरांनी शांततेच्या मार्गाने मूक मोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदवला.
स. १० वा. छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला व युवतींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चास प्रारंभ झाला. या मूक मोर्चात महाविकास आघाडीतील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते, पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना, शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विविध असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य आणि संवेदनशील सांगलीकरांनी दंडावर काळ्या फिती लावून सहभागी होत महायुती शासन व मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींचा मूक मोर्चाने निषेध नोंदवला.
आरोपींना फाशी झालीच पाहिजे, भिक नको संरक्षण हवे, अपयशी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, महिला सुरक्षिततेची नव्याने कायद्यात तरतूद झालीच पाहिजे, महिला स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नेमलाच पाहिजे, शाळा-महाविद्यालये जेथे सीसीटीव्ही कॅमेरे तेथे, आरोपींना पाठिशी घालणाऱ्या महायुती शासनाचा धिक्कार असो, मुली महिला सुरक्षित तर देश सुरक्षित अशी घोषवाक्ये असलेले मोर्चेकऱ्यांच्या हातातील फलक लक्षवेधी होते.
छ. शिवाजी महाराज पुतळ्यापासून मारुती रोड, टिळक चौक, हरभट रोड, कापड पेठ, महापालिका मार्गावरुन मूक मोर्चाचे स्टेशन चौकात सभेत रूपांतर झाले.
यावेळी मा. जिल्हाधिकारीसो यांना दिलेल्या निवेदनात लैंगिक अत्याचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा, अपयशी गृहमंत्र्यांचा राजीनामा, मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी नव्याने कायद्यात दुरुस्ती, शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे यासह १० मागण्या करण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महिलांवरील अत्याचार हे दुर्दैव असून आम्ही त्याचा निषेध करतो. शासनाने महिला सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात असे सांगितले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'महायुती शासन बहिणी व मुलींचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे. लाडक्या बहिणीला भिक नको, तिला सन्मान आणि संरक्षण द्या. सरकारी शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे पुरवा. आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ५० शाळांमधे मुलींना बॅड टच - गुड टच याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांवर अत्याचार खपवून घेणार नाही. आरोपींना पाठीशी घालणाऱ्या महायुती शासनाचा मी निषेध करतो.
संजय बजाज यांनी, शासनाने महिलांचा आवाज दाबण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला हे निंदनीय आहे. राज्य व केंद्र शासनाने याची गंभीर नोंद घेऊन महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक उपाय करावेत.
संजय विभूते म्हणाले, पक्ष पळवला त्याचा निर्णय दोन वर्षे झाली लागला नाही आणि महिलांना न्याय मिळावा म्हणून सनदशीर बंद बेकायदेशीर ठरविण्याचा निकाल एकाच दिवसात हे फारच भयानक आहे. महायुती शासनाचे हे कारस्थान हाणून पाडू. महिलांना त्यांचाच पैसा मतासाठी नको, तर त्यांना जिल्हा प्रशासन आणि पोलिस खात्याने संरक्षण द्यावे.
जयश्रीताई पाटील म्हणाल्या, 'लैंगिक अत्याचाराच्या घटना निंदनीय आहेत. महिलांनी संघटीत होऊन मुकाबला केला पाहिजे.'
यावेळी डॉ. सिकंदर जमादार, बिपीन कदम, अजित सुर्यवंशी, सतीश साखळकर, चंद्रहार पाटील, उमेश देशमुख, आशा पाटील, संगिता शिंदे व सौ. इंगळे, तेजस्विनी सुर्यवंशी, ज्योती अदाटे, सुजाता पवार, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, रेहाना शेख यांनी मनोगतात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस प्रशासन व शाळा व्यवस्थापनाने आरोपीला पाठिशी घातले आहे. महायुतीशासन हे महिलाविरोधी आहे. महिला व मुली यांच्या राज्यात असुरक्षित आहेत. बलात्कार करणाऱ्याला फाशीची तरतूद केली पाहिजे व या शासनाने राजीनामा दिला पाहिजे अशा भावना व्यक्त केल्या.
सहभागी काॅलेजच्या विद्यार्थ्यींनीं अंजली व वैष्णवी यांनी लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी आणि महायुती शासन आरोपीला पाठीशी घालत असल्याने राजीनामा द्यावा. अशी ठामपणे मागणी केली.
यावेळी महिलांनी फाशीचा दोरखंड उंचावून राखी, साडी चोळी परत करुन शासनाशी बहिणीचे नाते तोडल्याचे जाहीर केले. हा मूक मोर्चा महाविकास आघाडी, सर्व पुरोगामी पक्ष व सामाजिक संघटना आणि आम्ही संवेदनशील सांगलीकरांच्या वतीने संपन्न झाला.
या मूकमोर्चात संजय बजाज, राहूल पवार, सागर घोडके, सचिन जगदाळे, बजरंग पाटील, डॉ.सिकंदर जमादार, बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, सुजय नाना शिंदे, जयवंत नलवडे, संतोष निकम, प्रदिप निंबाळकर, नंदकुमार साळुंखे, विलास खेराडकर, शितल सदलगे, शितल दडगे, संजय शिकलगार, भारती व दिक्षित भगत, सद्दाम शेख, फिरोज पठाण,
रविंद्र वळवडे, हरिदास पाटील,मंगेश चव्हाण, वसीम मुल्ला, रज्जाक नाईक, डॉ. नामदेव कस्तुरे, संजय मोरे, नामदेव चव्हाण, अविनाश जाधव, शंभूराज काटकर, मयूर घोडके, विराज बुटाले, धनाजी कोळपे, प्रकाश मुळके, इरफान मुल्ला, दत्ता पाटील, सुरेश टेंगळे, रुपेश मोकाशी, मयूर पाटील,प्रशांत पाटील, नितीन मिरजकर, मुस्ताक रंगरेज, असिफ बावा, सचिन साबळे, रोहन माने, वैशाली धुमाळ, अनिता पांगम, सुरेखा सातपुते, फिरोज मुल्ला, शिवाजी मोहिते, मयूरेश पेडणेकर, सागर मुळे, प्रितम रेवणकर, विजय आवळे, युसुफ जमादार, संभाजी पोळ, शिवाजी पाटील, अमोल सुर्यवंशी, अक्षय अलकुंटे, शितल खाडे, अमित पाटील, अजय देशमुख,डॉ. संजय पाटील, नितीन तावदारे, राजेंद्र कांबळे, सुरेश गायकवाड, मोहसीन जामदार, बाबगोंडा पाटील, मौला वंटमुरे, प्रशांत देशमुख, रुपेश मोकाशी, उत्तम आबा कांबळे, उत्तम साखळकर, श्रीधर बारटक्के, धनंजय कोळपे, महालिंग हेगडे, विलास खेराडकर, शुभम जाधव, चेतन दडगे, आशा पाटील,किर्ती देशमुख यांनी कविता बोंद्रे, प्रणिता पवार, स्वाती सुर्यवंशी, अरुणा सुर्यवंशी, नूतन पवार, जयश्री घोरपडे, मानसी भोसले, सुनीता शेरीकर, शमशाद नायकवडी, राजेंद्र कांबळे, आशिष चौधरी, आयुब निशाणदार, प्रशांत अहिवळे व पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटना, विविध असोसिएशन्स यांचे अध्यक्ष, शैक्षणिक क्षेत्रातील घटक आणि संवेदनशील सांगलीकर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.