yuva MAharashtra काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले - पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन

काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले - पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑगस्ट २०२४
काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते यांच्या बलिदान व कष्टातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरु, मौलाना आझाद, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक व असंख्य काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपण सर्व भारतीय बांधव आहोत ही भावना प्रबळ करु या, असे प्रतिपादन काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. सांगली शहर काँग्रेसच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याला सलामी देताना ते बोलत होते

यावेळी बोलताना पृथ्वीराज बाबा पुढे म्हणाले की, धर्मनिरपेक्ष भारताचा काँग्रेसने चौफेर विकास केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतासाठी संविधान निर्माण केले. त्यामुळे मोठय़ा दिमाखात भारत प्रजासत्ताक बनला. संविधानामुळे देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही आणि अखंडता टिकली आहे. स्वातंत्र्य दिन हा आपल्या स्वातंत्र्याचा व लोकशाहीचा उत्सव आहे.आपण सर्व भारतीय आहोत. देशातील शेवटच्या घटकांपर्यंत स्वातंत्र्य व संविधानाचे लाभ पोहचले पाहिजेत, अशी अपेक्षा पृथ्वीराज बाबा पाटील यांनी व्यक्त केली.


राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय हे संविधानाच्या केंद्रस्थानी आहेत. सर्व नागरिकांना ते मिळाले पाहिजेत. आणि ते नागरिकांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबध्द आहे. असे प्रतिपादनही पृथ्वीराजबाबा पाटील यांनी केले.

सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस भवन व स्टेशन चौकात म. गांधी पुतळ्याजवळ पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन झाले. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मा पृथ्वीराज बाबा पाटील यांचे हस्ते तिरंगा फडकावून ध्वजारोहण करण्यात आले.

या प्रसंगी शैलजाभाभी पाटील, प्रा. सिकंदर जमादार, रामचंद्र पवार, अजित ढोले, प्रकाश जगताप, सचिन चव्हाण, अशोकराव मालवणकर, प्रा. एन. डी. बिरनाळे, मालन मोहिते, अरुण पळसुले, बाबगोंडा पाटील, पैगंबर शेख, मौलाली वंटमुरे, अनिल मोहिते, डी. पी. बनसोडे, मौला वंटमुरे, प्रशांत देशमुख, दिक्षितकुमार व भारती भगत, इरफान मुल्ला, विठ्ठलराव काळे, बाबगोंडा पाटील, हनुमंत यादव, विश्वास यादव, ॲड. भाऊसाहेब पवार, अरिफ मालगावे, राजेंद्र कांबळे, गणेश काकडे, सौ सीमा कुलकर्णी, शमशाद व शहनाज नायकवडी, मीना शिंदे, गणेश वाघमारे, लालसाब तांबोळी, याकुब मणेर, शैलेश पिराळे, गणेश काकडे, प्रकाश माने, सुरेश गायकवाड, नंदा कोलप, सरोज बर्गे, शमा अत्तार, रामसिंग परदेशी, इसाक मुल्ला, रफीक शेख, इब्राहिम पठाण, शिवाजी सावंत, विवेक अंकलीकर, विठ्ठलराव साठे, सुशांत नलवडे, गुलाबराव भोसले, तुकाराम बगाडे, महेश भंडारे, इ. मान्यवर व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.