yuva MAharashtra कुडाळ येथील बनावट नोटांचे कनेक्शन थेट पलूसशी ! तिघा संशयतांच्या मुसक्या आवळल्या !

कुडाळ येथील बनावट नोटांचे कनेक्शन थेट पलूसशी ! तिघा संशयतांच्या मुसक्या आवळल्या !



| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि. १४ ऑगस्ट २०२४
कुडाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा करण्यात आलेल्या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर, शाखाधिकारी राजेंद्र सोनकुसरे यांनी तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात संशयित व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या बनाव नोटांचा माघ काढत सांगली जिल्ह्यातील पलूस गाठले आणि तब्बल एक लाख 34 हजार 700 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री साडेअकरा वाजता बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 100 रुपयांच्या नऊ नोटा तसेच 200 आणि पाचशे रुपयांची एक नोट अशा एकूण 3200 रुपये किमतीच्या भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या 19 बनावट चलने नोटांचा कॅश डिपॉझिट मशीन द्वारे भरणा केला होता. नोटाबाबत संशय आल्याने, कुडाळ शाखेचे शाखा अधिकारी राजेंद्र सोनकुसरे यांनी नोटांची यंत्राद्वारे पुन्हा एकदा तपासणी केली. आणि या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तात्काळ कुडाळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

पोलिसांनी माग काढीत पलूस गाठले. या ठिकाणी कलर प्रिंटरचा वापर करून मुख्य संशयित आरोपी सुरेंद्र उर्फ सूर्या रामचंद्र ठाकूर हा पलूस गावातील त्याच्या घरी नोटांची छपाई करीत असल्याचे उघड झाले. त्याने या बनावट नोटा बँकेत भरण्यासाठी कुडाळ येथील विजय शिंदे आणि निशिगंधा कुडाळकर यांना सहभागी करून घेतले. या सर्वांचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश करीत ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.