Sangli Samachar

The Janshakti News

धर्मांतर अन विवाहासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या दोन धर्मांधांना सांगलीत अटक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
एकीकडे राज्यात अल्पवयीन मुली व तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडत असतानाच, सांगलीत एका हिंदू तरुणीवर धर्मांतर व लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या, आफताब पटेल व आयुब पटेल या बाप लेखांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या असून सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आस्था पटेल यांनी वेळोवेळी मोबाईल आणि सोशल मीडिया माध्यमातून संपर्क साबण या तरुणीशी मैत्री केली होती. मैत्रीनंतर आफताब याने या तरुणीशी धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव आणणे सुरू केले. वेळोवेळी पाठला करणे दमदाटी करणे, कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार सुरू केले.


तेव्हा या प्रकाराला वैतागून सदर तरुणीने हा प्रकार आपल्या घरी सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी सांगली शहर पोलीस स्टेशन गाठले व आफताब आणि त्याचे वडील आयुब पटेल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांवर विविध कलमानुसार गुन्हा नोंद करीत ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील या सदर प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

दरम्यान धर्मांतर आणि विवाहासाठी जबरदस्ती करणाऱ्या लव्ह जिहादच्या घटना सांगलीसह जिल्ह्यात वाढू लागलेल्याने, मुलींच्या पालकांची चिंता वाढली आहे. अशा घटना रोखण्याबाबत कडक पाऊले उचलण्याची गरज समाजातून व्यक्त होत आहे. यामध्ये मुलींचे प्रबोधन, घडणाऱ्या घटनांवर लक्ष, आणि जर कोणी मुलींना त्रास देत असेल त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी ही समाजातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.