| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑगस्ट २०२४
मा शुभम गुप्ता ,आयुक्त यांनी कार्यभार स्वीकारला पासून सर्व विभागाकडील आर्थिक बाबी बाबत नियोजन काटेकोरपणे करून त्यांची अंमलबजावणी वर लक्ष केंद्रित केले आहे, परिणामी मनपाच्या तिजोरीत भरीव वाढ होत आहे , विकास कामाचे नियोजन देखील त्याचं बरोबर केले आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील मालमत्ता धारकांनी ३१ जुलै २०२४ अखेर मालमत्ता कराचा संपुर्ण भरणा एक रक्कमी मरुन सामान्य करामध्ये १०% व ५% सवलतीचा लाभ एकुण ४१८७५ इतक्या मालमत्ता धारकांनी घेतलेला आहे. कराचा भरणा केल्याने आज अखेर रक्कम रु.२७ कोटी ३१लाख पेक्षा जास्त रक्कम जमा झालेली आहे.
नागरीकांना आपल्या कराचा भरणा डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, यूपीआय व ऑनलाईन स्वरुपात भरण्याची सोय महानगरपालिकेकडून केली आहे. मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा मिळकत धारकांनी केला आहे त्यापैकी ग्रो ग्रिन या माध्यमातुन प्रत्येक बिलामध्ये र.रु.१० ची सवलतीचा लाम ९५३१ इतक्या मालमत्ता धारकांनी घेवुन कागदी बिल / रीसीट ऎवजी ई-बिल/रीसीटला पंसती देवुन पर्यावरणाप्रती सजगता दाखवली आहे. नागरिकांच्या कडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे,३० कोटी कडे वाटचाल सुरू आहे
यावेळी ऑनलाइन सुविधांचा वापर ग्राहकांनी केल्याने वेळ , कागद , आणि घरबसल्या कर भरता आल्याने समाधान आणि आनंद देखील व्यक्त केला आहे. नागरिकांनी कर भरून महापालिका विकास कामास सहकार्य करावे असे आवाहन कर व मालमत्ता उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी केले आहे.