| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १४ ऑगस्ट २०२४
गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्ताने दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा कोर्डीनेटर डॉ. हेमा चौधरी यांचे 'अवयव दान' या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान झाले.
याप्रसंगी उपस्थित दीडशे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कॉलेज स्टाफ यांनी हा विषयाचे शास्त्रोक्त ज्ञान करून घेऊन शंका समाधान करून घेतले.
कॉलेजमधील एन एस एस युनिट आणि अनाटोमी डिपार्टमेंट यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
यावेळी एन. एस. एस. प्रोग्रॅम ऑफिसर आणि अनाटोमी डिपार्टमेंटचे एचओडी डॉ. जिनेश्वर येलीगौडा, व्हाईस प्रिन्सिपल डॉ .सुहास पाटील, एफएमटी डिपार्टमेंटचे एच ओ डी डॉ. प्रताप भोसले, माजी प्राचार्या डॉ. बिडीवाले तसेच कॉलेजचा इतर स्टाफ उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन पृथ्वीराज पाटील आणि ट्रस्टी वीरेंद्र पाटील तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांचे सहकार्य लाभले.