| सांगली समाचार वृत्त |
यवतमाळ - दि. २५ ऑगस्ट २०२४
बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केला असून, विकृत माणसाचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याची ग्वाही, अजित पवार यांनी यवतमाळ मधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना दिली. बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली.
जो चुकीचे वागेल त्याला शासन झालेच पाहिजे, मग तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. किंवा कितीही मोठ्या वशिलाचा असू द्या, त्याची फिकीर आम्ही करणार नाही, असे सांगून अजित पवार म्हणाले की त्याला इतकं कडक शासन मिळायला हवे की परत असे कृत्य करता आलेच नाही पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्याचे गुप्तांगच काढून टाकले पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याचे आता सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान बदलापूर येथील शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुले काठीवाला दादा म्हणून ओळखायचे. या प्रकरणाचा तातडीने तपास व्हावा यासाठी राज्य सरकारने एसआयटी ची स्थापना केली आहे. त्याच्या विरोधात फास्ट ट्रॅक न्यायालयात कटला चालवला जाणार आहे.