Sangli Samachar

The Janshakti News

जगाला वाचवण्यासाठी भारताची गरुड झेप, इस्रोच्या कामगिरीमुळे जगभरातून कौतुक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑगस्ट २०२४
भारताने आपला ऐतिहासिक ७८वा स्वातंत्र्य दिन साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी एक नवा इतिहास रचण्यासाठी इस्रोच्या माध्यमातून उड्डाण केले. इस्रो अर्थ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने काल 16 ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-08 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. हे स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (SSLV) - 3 च्या च्या तिसऱ्या आणि अंतिम विकासात्मक उड्डाणाद्वारे प्रक्षेपित केले गेले.

EOS-8 आणि स्टार्टअप कंपनी स्पेस रिक्षाचा SR-0 उपग्रह घेऊन जाणारे भारताचे छोटे प्रक्षेपण वाहन प्रक्षेपणाची उलटी गिनती शुक्रवारी पहाटे 2. 30 वाजता सुरू झाली. 500 किलो वाहन नेण्याचे क्षमता असलेल्या EOS-08 ने आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी सकाळी सुमारे 9. 17 वाजता 175. 5 किलो वजनाचा सूक्ष्म उपग्रह इओएस 0.8 घेऊन उड्डाण केले.

विकासाच्या टप्प्यातील एसएसएलव्ही चे हे तिसरे आणि अंतिम उड्डाण आहे. यानंतर रॉकेट पूर्ण ऑपरेशनल मोडमध्ये येईल. एसएसएलव्ही रॉकेट पाचशे किलोमीटरच्या कक्षेत, लघु, सूक्ष्म किंवा ज्ञान उपग्रह प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. रॉकेटचे तीन टप्पे घन इंधनाने चालतात, तर अंतिम वेग ट्रिमिंग मॉडेल द्रव इंधन वापरतो. लिफ्ट ऑफ च्या 13 मिनिटानंतर ईओएस - 08 त्याच्या कक्षेत सोडेल आणि सुमारे तीन मिनिटानंतर एसआर - 08 वेगळे होईल. दोन्ही उपग्रह 475 किलोमीटर उंचीवर रॉकेट पासून वेगवेगळे होतील.


एसआर - 08 चेन्नई आधारित स्पेस सेंटर स्पेस रिक्षासाठी पहिला उपग्रह असेल. दरम्यान इसरो ने सांगितले की, ईओएस - 08 मिशनच्या प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सूक्ष्म उपग्रहांचे रचना आणि विकास यांचा समावेश आहे. यामध्ये मायक्रोसॅटॅलाइट बस सुसंगत ते लोड उपकरणे तयार करणे आणि भविष्यातील कार्यरत उपग्रहांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान समाविष्ट करणे हे देखील समाविष्ट आहे. 

ईओएस - 08 उपग्रहाचे आयुष्य एक वर्ष निश्चित करण्यात आले असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो नुसार प्रस्तावित मिशन एसएसएलव्ही विकास प्रकल्प पूर्ण करेल. यानंतर ते भारतीय उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी न्यूज स्पेस इंडिया लिमिटेड च्या मिशनसाठी वापरले जाईल.

इस्रोचे हे मिशन भारतासह संपूर्ण जगासाठी खास आहे. त्याच्या यशामुळे भारताला पृथ्वीच्या हृदयाचे ठोके ऐकायला मिळणार आहेत
 त्यामुळे नैसर्गिक आपत्तींची माहिती वेळेत उपलब्ध होणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भूकंप सुनामी किंवा इतर नैसर्गिक आपत्ती सारख्या पृथ्वीच्या हालचालींची माहिती तात्काळ मिळणार आहे. या यानाच्या मिशन आयुष्य एक वर्ष आहे. त्याचे वस्तुमान अंदाजे 175. 5 किलोग्रॅम आहे. आणि ते अंदाजे 420 व्याज पॉवर निर्माण करते असे इस्रो च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंतराळ क्षेत्रात भारताने केलेली कामगिरी जगभरातील देशांसाठी कौतुकाचा विषय ठरलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या अधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे.