yuva MAharashtra दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी हरकत नाही, पण स्वसंरक्षणार्थ महिलांना रिवाल्वर द्या, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत !

दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी हरकत नाही, पण स्वसंरक्षणार्थ महिलांना रिवाल्वर द्या, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत !


| सांगली समाचार वृत्त |
अमरावती - दि. २६ ऑगस्ट २०२४
बदलापूर आणि राज्य ठिकठिकाणी झालेल्या मुलींवरील अत्याचारावरून सर्वत्र निषेध मोर्चाद्वारे संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपींना अधिकाधिक कठोर शिक्षा व्हावी ही मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणी व महिलांना स्वसंरक्षणार्थ उपाययोजनाबाबतचा मुद्दा चर्चेत आला आहे.

दरम्यान अमरावतीमधील शिंदे शिवसेनेचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष नानकराम नेभनानी यांनी रिवॉल्वर देण्याची मागणी करीत असताना, दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालतील, पण महिला सुरक्षित राहायला हव्यात. जर असे झाले तर यानंतर कोणीही मुलींकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत, असे विधान केल्याने संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी बोलताना नानकराम नेभनानी म्हणाले की, राज्यात महिला अत्याचाराच्या घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर लक्ष ठेवून गुन्हेगारांना योग्य ते शासन करतीलच. पण गुन्हाच घडू नये म्हणून महिलांना रिवाल्वर देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासाठी जर परवानगी मिळाली, तर अमरावती मधील महिलांना मी स्वतः रिवॉल्वर घेऊन देईन असे निभनाने यांनी म्हटले आहे.


यावरून आता उलट सुलट चर्चा सुरू असून, रिवॉल्वर नसले तरी एखादे असे शस्त्र महिलांना द्यावे, ज्यामुळे त्या कठीण प्रसंगात स्वसंरक्षण करू शकतील. मात्र उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी नेभनानी यांच्या विधानाला विरोध केला आहे. महिलांची सुरक्षितता महत्त्वाचे आहेत परंतु त्यासाठी त्यांना शस्त्र वापरण्याची परवानगी देण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही, असे सौ. फडणवीस यांनी म्हटले आहे. तर अनेक महिलांनी नेभनानी यांच्या विधानाला सहमती दर्शविली असून, यापुढे मुलींनी व महिलांनी आपल्या पर्समध्ये एखादे शस्त्र ठेवण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.