Sangli Samachar

The Janshakti News

मुसळधार पावसामुळे अलमट्टीमधून तीन लाखाचा विसर्ग व्हावा, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
सध्या ऑगस्टमधील हवामान खात्याचा अंदाज व पावसाचे वातावरण पाहता, वारणा, पंचगंगा व कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत. संपूर्ण धरण क्षेत्र परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने व पर्जन्यमान जोरदार असल्याने 
अलमट्टीने कोणत्याही परिस्थितीत तीन लाखाचा विसर्ग करून पाणी पातळी खाली आणावी, अशी मागणी अलमट्टी वहिप्परगी धरण प्रशासन आणि मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. मुख्य सचिव, जलसंपदा विभाग पुणे, मा. जिल्हाधिकारी सांगली, मा. अधीक्षक अभियंता जलसंपदा कोल्हापूर, सांगली, मा.कार्यकारी अभियंता कोल्हापूर, सांगली. यांच्याकडे, कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यानच्या काळात हिप्परगी धरण प्रशासनाने पुन्हा दरवाजे लावून, चार दरवाजे उघडले केले होते. ते पूर्णपणे उघडेच ठेवण्याची आवश्यकता आहे 

सध्या राजापूर मधून 73, 875 विसर्ग सुरू आहे. दूधगंगा वेदगंगा 19,000 विसर्ग, घटप्रभा 35000 विसर्ग असा सर्व मिळून अलमट्टी मध्ये 1,28,000 आवक आहे. सध्या अलमट्टीने 1,25,000 हजार विसर्ग केल्याचे पाणी पातळीमध्ये अहवालामध्ये नमूद करण्यात आले असून धरणातील उंची 519.45 मीटर आहे. तर 120.417 TMC इतका साठा अलमट्टीने केला असल्याचे निदर्शनास येते. अलमट्टी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी येऊनही त्यांनी 119 मीटर लेवल मेंटेन केली असून अलमट्टीतील पाणी कमी होताना दिसत नाही. सध्याच्या परिस्थितीत अलमट्टीने तीन लाखांना विसर्ग करणे फार जरुरीची आहे. मागे सर्वच धरणे 90% पेक्षा जास्त भरली असून त्यांनाही आता विसर्ग करणे क्रमप्राप्त आहे. 


अलमट्टीने पाणी पातळीमध्ये त्यांच्या अहवालात 98,000 आवक दाखवत आहे वास्तविक आवक ही 1,27,000 ने होत आहे. ही बाब महाराष्ट्र प्रशासनाने गंभीरपूर्वक घेऊन, यावर आपण कायमचा बंदोबस्त करावा अशीही विनंती केली आहे.

सध्या नरसोबावाडी येथे तिसऱ्यांदा दक्षिणद्वार झाले आहे. सांगली आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी 22 फूट असून कालच्या पावसामध्ये आठ फुटाने पाणी वाढली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिली, आणि अलमट्टीने विसर्ग वाढविला नाही तर सांगली सह कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा धोका निर्माण होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे.