Sangli Samachar

The Janshakti News

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेण्यास भाजपा- संघप्रेमींचा विरोध !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ ऑगस्ट २०२४
एका बाजूला वरिष्ठ पातळीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे भाजपा आणि संघ परिवारात अजित पवार यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून, आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी गटाला सोबत घेतल्यास भाजपाला लोकसभेप्रमाणेच फटका बसू शकतो, अशी प्रतिक्रिया भाजपप्रेमी व संघप्रेमी घटकांकडून व्यक्त होत असल्याने सर्वत्र खळबळ मारली आहे.

मावळचे भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी महायुतीकडून नक्की केल्यास, त्यांचा प्रचार न करण्याचा ठराव मंजूर केला आहे. 


मावळ प्रमाणेच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातून अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता विधानसभेला पुन्हा सत्तारूढ व्हायचे असेल तर भाजपला अजित पवार हे गटाबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ नेत्याने बोलून दाखवली आहे. आपल्याप्रमाणेच भाजपा व संघ परिवारातील प्रत्येकाचे हीच भावना असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीतील निकालावरून आपल्याला धडा मिळाला आहे. त्यावरून विधानसभा निवडणुकीसाठी यातून बोध घ्यायला हवा असेही या नेत्याने म्हटले आहे.