yuva MAharashtra हरभट रोडवरील संस्कृती कलेक्शन यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले !

हरभट रोडवरील संस्कृती कलेक्शन यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० ऑगस्ट २०२४
येथील भावे नाट्यगृह समोरील जयश्री टॉकीज जवळ संस्कृती कलेक्शन कपडे विक्रीचे दुकान आहे , त्यांनी महापालिकेच्या पार्कींग जागेस जाण्याच्या मार्गावर अचानकपणे लोखंडी दार लावून अतिक्रमण केले असल्याची माहिती उप आयुक्त वैभव साबळे यांना मिळाली, 


शहरातील खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना या जागेत पार्कींग व्यवस्था केली आहे. या मार्गावर अतिक्रमण केल्याने नागरिकांची अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अतिक्रमण पथकाने जागेवर जाऊन अतिक्रमण काढण्याची सत्वर कार्यवाही केली. संबंधित दुकानदाराकडून पुन्हा अतिक्रमण होणार नाही, या बाबत काळजी घेत असल्याचे सांगितलेवरून पुढील कारवाई केली नाही, असे अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांनी सांगण्यात आले.