yuva MAharashtra फार्मा हेल्थकेअर अँड वेलनेस समितीच्या को-चेअरमन पदी विनायक शेटे यांची अभिनंदन निवड , अभिनंदनचा वर्षाव !

फार्मा हेल्थकेअर अँड वेलनेस समितीच्या को-चेअरमन पदी विनायक शेटे यांची अभिनंदन निवड , अभिनंदनचा वर्षाव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
सांगली येथील सुप्रसिद्ध औषध विक्रेते, सांगली मेडिकलचे संचालक विनायक शेटे यांची, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर या राज्याच्या व्यापार उद्योग कृषी उद्योग व सेवा क्षेत्राच्या शिखर संस्थेचे निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे. शतक महोत्सवी वर्षाचा समावेश असलेल्या, ऐतिहासिक कार्यकारणी मधील महत्त्वपूर्ण तज्ञ समितीच्या पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती प्रक्रिया सुरू असून, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा तज्ञ विषयी समित्यांपैकी फार्मा हेल्थकेअर अँड वेलनेस समितीच्या को चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर त्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी विनायक शेटे यांची ही निवड केली आहे

व्यवस्थापन समितीमधील उपाध्यक्ष रमाकांत मालू हे समितीचे मार्गदर्शक पदाधिकारी असून त्यांच्याच मार्गदर्शनानुसार सदर समितीमधील अन्य सदस्यांच्या समवेत नियमित बैठकांच्या माध्यमातून उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. 

विनायक शेटे यांनी यापूर्वी सांगली शहर तसेच जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या, त्याच त्याचप्रमाणे राज्य पातळीवरील मेडिकल असोसिएशनच्या महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी यशस्वी पूर्ण केली आहे.

औषध विक्रेत्यांच्या समस्यावर अत्यंत आक्रमकपणे विनायक शेटे यांनी लढा दिला असून, औषध विक्रेत्यांना न्याय मिळवून दिला आहे. 2005 आणि 2019 च्या महापुराने पूरग्रस्त औषध विक्रेत्यांना महाराष्ट्र राज्य मेडिकल असोसिएशनद्वारे तसेच राज्य शासनामार्फत नुकसान भरपाई मिळवून देण्यात विनायक शेटे यांचा सिंहाचा वाटा आहे.


औषध विक्रेता संघटनेच्या तसेच इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विनायक शेटे यांनी अनेकविध उपक्रमामध्ये सहभाग घेतला असून, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येच्या वेळी धावून जाणारा 'आपला माणूस' म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे लिंगायत समाजाच्या कार्यक्रमात त्यांचा मोलाचा सहभाग असतो. तनमनधनाने ते सर्व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असतात. विनायक शेटे यांच्या निवडीबद्दल मेडिकल क्षेत्रातून तसेच विविध संस्था, संघटना, समाजातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.