| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १२ ऑगस्ट २०२४
उद्योग आणि व्यापार वृद्धीसाठी आधुनिक काळात विमानतळ आवश्यक आहेच. सांगली जिल्ह्यात कवलापूर येथील जागेवर विमानतळाला मंजुरी घेऊन, ते पूर्ण करणे ही आता माझी जबाबदारी असेल, त्यासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया आपण लवकरात लवकर सुरू करू, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पै. पृथ्वीराज पवार आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांना पुणे येथील भेटीत दिली आहे.
सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत कवलापूर विमानतळ या विषयावर बोलताना या जागेतील तांत्रिक बाबीपासून ते जिल्ह्याच्या शेती, उद्योग व व्यापार वाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मकरंद देशपांडे यांनी कोल्हापूर विमानतळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडली. भारतचे निर्धार वेळी या विमानतळाचे धावपट्टी बनवण्यात आली असून ती श्रमदानातून केली होते याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
पै. पृथ्वीराज पवार यांनी कवलापूर विमानतळाच्या 165 एकर जागेचा बाजार करण्याचा डाव कसा आखला गेला होता याचे सविस्तर विवेचन केले. या ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी भूखंड विक्री करण्यात येणार होती. मात्र सांगलीकरांनी एकजुटीने हा डाव हाणून पाडला. सांगलीच्या सोहूबाजूला म्हणजे कोल्हापूर, कराड, विजापूर आणि सोलापूर या ठिकाणी विमानतळ आहे, मात्र उद्योग व शेती नगरी असलेल्या सांगलीला मात्र तो का नाही ? असा सांगलीकरांचा सवाल आहे, असेही पै. पवार यांनी मोहोळ यांच्याशी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, बेदाणा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्याचप्रमाणे जागतिक दर्जाचे अनेक उत्पादने या ठिकाणी तयार होतात, त्यामुळे कवलापूर येथे कार्गो विमानांची सोय झाली तर हा सर्व माल जगाच्या पाठीवर पोहोचेल व जिल्ह्याच्या विकासाला वेग येईल असे सांगून पै. पवार म्हणाले की, जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग झाले पाचवा प्रस्तावित आहे तरीही नवे उद्योग येथे यायला तयार नाहीत, आयटी पार्क साठी ही कंपन्या तयार आहेत, पण त्यांची पहिली मागणी विमानतळ ही आहे. अशा परिस्थितीत आम्ही विकासात मागेच राहणार का ? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी बोलताना ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, छोट्या विमानतळांचा विषय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आहे. कोल्हापूरचे विमानतळ करण्याबाबत या प्राधिकरणासह केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्रालयाची संयुक्त बैठक आपण घेऊ, त्याआधी या जागेचा स्टेटस तपासून घ्यावा लागेल. त्याबाबत मी माझ्या यंत्रणेला आदेश दिले आहेत. ही जागा कोणाच्या ताब्यात आहे ? ती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया झाली का ? हे तपासून पाह. आठवड्याभरात पुढचा टप्पा सुरू करूया. असे सांगून ना. मोहोळ मारण्याचे सांगली जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे गोष्ट माझ्या हातून घडत असेल तर ती मी प्राधान्याने करेन कवलापूर विमानतळ आता माझी जबाबदारी असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सांगली किंवा आपले जुने ऋणानुबंध आहेत कुस्तीच्या आखाड्यात सांगलीने मला नेहमीच बळ दिले आहे व माझे गुरु कोल्हापूरचेच आहेत. त्यामुळे या गावात विमानतळ होण्यासाठी माझा हातभार लागला तर मला आनंदच आहे, अशा शब्दात ना. मुरलीधर मोहोळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे पै. पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.