yuva MAharashtra मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नव्या वादात ? अनाथ व निराधार बहिणी सावत्र आहेत का ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नव्या वादात ? अनाथ व निराधार बहिणी सावत्र आहेत का ?


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ ऑगस्ट २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. परंतु पहिल्या दिवसापासूनच ही योजना वादाने घेरली आहे. कधी हा वाद यातील त्रुटीमुळे, कधी अर्ज भरण्यासाठी तुडुंब गर्दी केलेल्या महिलांना सोसाव्या लागणाऱ्या मनस्तापामुळे, तर कधी यातील सातत्यपूर्ण बदलामुळे ही योजना कायमच चर्चेत राहिली.

अशातच या योजने विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे निर्माण झालेली अनिश्चिततेची परिस्थिती दूर झाली. परंतु आता एका नव्या वादाला तोंड फुटल्या असून, ही योजना केवळ 'संसारी लाडक्या बहिणीसाठी आहे का ?' असा सवाल केला जाऊ लागला आहे. विविध ठिकाणच्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रातील महिलांना दिवसभर काम करून पाच रुपये मोबदला मिळतो तर दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण योजनेत कोणत्याही कामाशिवाय प्रतिदिन 50 घरबसल्या मिळतात. हा विरोधाभास दिसून येत आहे. 


आता विरोधकांकडून याच मुद्द्याचा वापर केला जात असून एकनाथ शिंदे यांना काही बहिणी लाडक्या तर काही दोडक्या अर्थात नावडत्या असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. सर्वच ठिकाणी या योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले जात असतानाच, राज्यातील महिला व बालविकास आयुक्तालया अंतर्गत सरकारी व खाजगी संस्थांमध्ये हजारो निराधार, अनाथ, अठरा वर्षाच्या पुढील युवती, ज्येष्ठ महिला आश्रयाला आहेत. या महिलांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे कल्याणकारी सरकार असल्याचा डंका वाजवणाऱ्या शासनाच्या दिव्याखालीच अंधार असल्यास की टीका होऊ लागली आहे. 

राज्यातील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात न्यायालयाच्या आदेशाने निराधार महिलांना दाखल केले जाते. या महिलांना शिवणकाम, झाडू बनवणे आधी प्रकारची कामे दिली जातात. यासाठी त्यांना प्रतिदिन पाच रुपये इतका अत्यल्प मोबदला मिळतो. याचप्रमाणे राज्यातील कारागृहात असलेल्या महिला कैदीही या योजनेपासून कोसो दूर आहेत. मनोरुग्ण महिला तर सरकारच्या खीजगणितीतही नाहीत. आपल्यालाही 'लाडकी बहीण योजनेचा' अशी मागणी या अनाथ, निराधार त्याचप्रमाणे कैदी महिलांकडून होऊ लागली आहे. 

या पार्श्वभूमीवर 'अनाथांचा नाथ एकनाथ' अशी इमेज तयार झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय आणि कसा मार्ग काढतात, या सर्व महिलांनाही लाडकी बहीण योजनेत समाविष्ट केले जाणार का याचे उत्तर आगामी काळात दडले आहे.